ट्रक-पिकअप अपघातात दोन ठार
By Admin | Updated: January 25, 2016 22:51 IST2016-01-25T22:51:55+5:302016-01-25T22:51:55+5:30
ट्रक-पिकअप अपघातात दोन ठार

ट्रक-पिकअप अपघातात दोन ठार
नाशिक : मुंबई महामार्गावरील रेमंड कंपनीसमोर रविवारी (दि़२४) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ट्रक व पिकअप यांच्यात समोरासमोर अपघात झाला़ त्यामध्ये नूरमहंमद युनूस शेख (४२, रा़ बागवानपुरा, नाशिक) व भरत रामदास भांगरे (४०, रा़ वाकी, ता़ इगतपुरी, जि़ नाशिक) या दोघांचा मृत्यू झाला आहे़
वाडीवऱ्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास रेमंड कंपनीसमोर ट्रक व पिकअप यांची समोरासमोर धडक झाली़ यामध्ये नूरमहंमद युनूस शेख यांचे डोके व पायास, तर भरत भांगरे यांच्या डोक्यास जबर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ खेरकर यांनी तपासल्यानंतर स्पष्ट झाले.
दरम्यान, या अपघाताची वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)