शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वाडीवऱ्हेजवळ अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 01:38 IST

वाडीवऱ्हे : नाशिक - मुंबई महामार्गावरील वाडीवऱ्हे पोलीस स्टेशन हद्दीत रोथे एर्ड कंपनीसमोर पिकअप आणि लक्झरी बस यांच्यात झालेल्या ...

ठळक मुद्देचार जखमी : पिकअपचे टायर फुटल्याने लक्झरी बसला धडक

वाडीवऱ्हे : नाशिक - मुंबई महामार्गावरील वाडीवऱ्हे पोलीस स्टेशन हद्दीत रोथे एर्ड कंपनीसमोर पिकअप आणि लक्झरी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन जण ठार, तर चोघे जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे.इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव आणि अधरवड येथील तिघे जण महिंद्रा पिकअपने (क्र. एमएच १५ एजी ९४७७) नाशिककडून घोटीकड़े येत असताना रोथे कंपनीसमोर पिकअप वाहनाचे टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे पिकअप दुभाजक ओलांडून पलीकडील मुंबईकडून इंदूरला जाणाऱ्या लक्झरी बसला (एमपी ३० पी २४७७) धडकली.या अपघातात पिकअपमधील योगेश दामू वाजे (३५, रा. खेडभैरव आणि किरण शिवाजी बऱ्हे (३०, रा. अधरवड, ता.इगतपुरी) हे दोघे रुग्णालयात नेले असता मयत घोषित करण्यात आले, तर संदीप यशवंत केकरे (२७) हा पिकअपमधील तरुण जखमी झाला. बसमधील फ्रैंक डी. रिजारियो (रा. मुंबई), लक्झरी बसचालक रमेश दयाराम यादव, नितीन धोपटे (सर्व रा. इंदूर) हे जखमी झाले आहेत.घटनेची माहिती मिळताच जगद‌्गुरू नरेंद्र महाराज संस्थानची रुग्णवाहिका आणि घोटी टोल नाका रुग्णवाहिका या अपघात स्थळी दाखल झाल्या. जखमींना नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलविले असता योगेश दामू वाजे आणि किरण शिवाजी बऱ्हे या दोघांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले तर इतर जखमींवर उपचार सुरू आहेत.अपघातात पिकअप वाहनाचा चक्काचूर झाला आहे, तर बस बाजूला खड्ड्यात जावून आदळली. बसमधील प्रवाशी दिवाळीसाठी मुंबईहून इंदूरला चालले होते. बसमध्ये २५ ते ३० प्रवासी होते. वाडीवऱ्हे पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू