साकूर फाट्याजवळ अपघातात दोन ठार
By Admin | Updated: May 1, 2017 01:24 IST2017-05-01T01:24:43+5:302017-05-01T01:24:52+5:30
बेलगाव कुऱ्हे : घोटी-सिन्नर महामार्गावरील साकूरफाटा येथील संग्राम हॉटेलजवळ मालवाहतूक करणाऱ्या ट्रक व टेंपोच्या अपघातात मुंबईचे दोन युवक ठार झा

साकूर फाट्याजवळ अपघातात दोन ठार
बेलगाव कुऱ्हे : घोटी-सिन्नर महामार्गावरील साकूरफाटा येथील संग्राम हॉटेलजवळ मालवाहतूक करणाऱ्या ट्रक व टेंपोच्या अपघातात मुंबईचे दोन युवक ठार झाले.
रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास मालवाहतूक करणाऱ्या ट्रक क्र . एमएच ४६, एफडी ६४० तर टेंपो क्र मांक एमएच ४३ एडी ४५८६ यांची धडक झाली. त्यात मुंबई येथील अकील शेख (१९), तर दुसरा तरु ण २५ वर्षीय असून, त्याची ओळख अजून पटलेली नाही. हे दोघेही ठार झाले. याबाबत वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात मोटर अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती समजताच वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शीतलकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बोडके, कर्डक, आव्हाड यांनी अपघातस्थळी तत्काळ धाव घेतली. (वार्ताहर)