कुशेगाव येथील दोघे अपघातात ठार

By Admin | Updated: November 26, 2015 23:18 IST2015-11-26T23:17:19+5:302015-11-26T23:18:15+5:30

कुशेगाव येथील दोघे अपघातात ठार

Two killed in Kusgaon accident | कुशेगाव येथील दोघे अपघातात ठार

कुशेगाव येथील दोघे अपघातात ठार


घोटी : कुशेगाव (पिंपळवाडी) येथील दोन तरुण एका विचित्र अपघातात जागीच गतप्राण झाले.
घोटीहून होंडा कंपनीची स्प्लेंडर गाडी क्र मांक एमएच १५ डी.जे. ४७६८ या दुचाकीवरून आपल्या गावी कुशेगाव येथे येत असताना पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना मुंढेगाव जवळ जिंदाल कंपनीच्या गेटसमोर धडक दिल्याने दोघेही जागीच ठार झाले. यामध्ये मयतांमध्ये रामदास पांडू सराई (३६) व सोमनाथ भोरु सराई (३५ ) अशी मृतांची नाव आहेत. यावेळी नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांनी मृतांना घोटी येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. (वार्ताहर)

Web Title: Two killed in Kusgaon accident