नाशिक - पेठरोडवरील रातेगाव शिवारात ट्रक आणि क्रूझर या दोन वाहनांच्या भीषण अपघातात दोन जण ठार झाले असून गटविकास अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी व 2 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. नाशिकच्या पेठ रोडवर शुक्रवारी (दि.2) भीषण अपघात झाला असून वाहनचालकासह दोन जणांचा मृत्यू झाला आहे. बाळू गांगुर्डे व कल्पेश बोरसे असे मृत्य व्यक्तींची नावे आहे. या अपघातात दोन गटविकास अधिकारीही गंभीर जखमी झाले आहे. जखमींमध्ये सात पोलिसांचाही समावेश आहे. हे अधिकारी व पोलीस कर्मचारी खासगी वाहनाने नाशिककडे येत असताना हा अपघात झाला असून आयशर टेम्पोने क्रूझर गाडीला कट मारल्याने हा अपघात झाला असून या अपघातात क्रूझर वाहनाचा पेठ येथील चालक बाळू शंकर गांगूर्डे हा चालक ठार झाला असून मालेगाव तालुक्यातीसल नालचोंडी येथील कल्पेश बोरसे या व्यक्तीचाही या अपघातात मृत्यू झाल्याचे समजते.
पेठ रोडवर भीषण अपघातात दोन ठार ; बीडीओसह 9 जण गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 19:56 IST
पेठरोडवरील रातेगाव शिवारात ट्रक आणि क्रूझर या दोन वाहनांच्या भीषण अपघातात दोन जण ठार झाले असून गटविकास अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी व महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
पेठ रोडवर भीषण अपघातात दोन ठार ; बीडीओसह 9 जण गंभीर
ठळक मुद्देनाशिक - पेठरोडवर भीषण अपघातअपघातात चालकासह दोन ठारबीडीओसह पोलीस कर्मचारी व महिला जखमी