ट्रकला दुचाकीची धडक, चांदवडचे दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:17 IST2021-09-06T04:17:34+5:302021-09-06T04:17:34+5:30
मालेगावकडून धुळ्याकडे भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकी (क्र. एमएच ४१ आर ७६६०) ने सहयोग हॉटेलजवळ गतिरोधकावर ...

ट्रकला दुचाकीची धडक, चांदवडचे दोघे ठार
मालेगावकडून धुळ्याकडे भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकी (क्र. एमएच ४१ आर ७६६०) ने सहयोग हॉटेलजवळ गतिरोधकावर पुढे चालणाऱ्या अज्ञात वाहनाला धडक दिली. यात दुचाकीस्वार सागर ज्ञानेश्वर ठाकरे (२१, रा. चांदवड) हा जागीच ठार झाला, तर त्याचा जोडीदार स्वप्नील राजाराम ठाकरे (३०) गंभीर जखमी झाल्याने त्यास सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचार सुरू असताना स्वप्नील ठाकरेचाही मृत्यू झाला, घटनास्थळी वाहतूक कोंडी झाल्याने सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती गोपनारायण, उपनिरीक्षक शिंदे, जमादार भदाणे, पोलीस नाईक ढगे, वाघ, गांगोडे आणि कर्मचारी पुंड यांनी वाहतूक सुरळीत सुरू केली. तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार खैरनार करीत आहेत.
वाढत्या अपघाताने नागरिकांत चिंता
महामार्गावर वारंवार घडत असलेले अपघात हा नागरिकांच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनला आहे. महामार्गावर वाहने भरधाव वेगाने जातात हे सर्वश्रुत असले तरी रस्त्यावर शहर अथवा शाळा-महाविद्यालये असली तर वेग नियंत्रित ठेवणे स्वाभाविक बाब आहे; परंतु दुचाकी असो की चारचाकी प्रत्येक वाहने स्वत:चा व दुसऱ्याचा विचार न करता निष्काळजीपणे वाहने हाकतात. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. शहराजीक अशी भरधाव वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांवर महामार्ग पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.