सायने शिवारातील अपघातात दोन ठार
By Admin | Updated: January 6, 2017 01:01 IST2017-01-06T01:01:22+5:302017-01-06T01:01:36+5:30
सायने शिवारातील अपघातात दोन ठार

सायने शिवारातील अपघातात दोन ठार
मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर चाळीसगाव फाटा ते सायने शिवारात दोन दुचाकींची धडक होऊन दोन्ही दुचाकीवरील दोन जण ठार झाले.
सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पितांबर दशरथ बोरकर (४१) रा. मोहपाडा या मेंढपाळाने फिर्याद दिली. दुचाकीचालक (क्र. एमएच ४१ एल ७१६५) गौतम दिलीप मोरे याने दुचाकी नेत असताना समोरून चाळीसगाव फाट्याकडून दहिवाळ गावाकडे जाणारी दुचाकीला (क्र. एमएच ४१ २१०५) धडक दिली. यात दुचाकी क्रमांक ७१६५ वरील स्वार पितांबर बोरकरचा भाऊ विश्वास दशरथ बोरकर (५०), रा. मोहपाडा आणि दुचाकी क्रमांक २१०५ वरील भीमा दिलीप मोरे (३२), रा. अजंदेपाडा या दोघांच्या मरणास कारणीभूत ठरला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. (वार्ताहर)