अपघातात दोन ठार
By Admin | Updated: February 15, 2016 00:22 IST2016-02-15T00:18:57+5:302016-02-15T00:22:39+5:30
एक जण जखमी : येवला-मनमाड रस्त्यावरील घटना

अपघातात दोन ठार
येवला : येवला-मनमाड रस्त्यावर धानोरे शिवारातील मोठे मारुती मंदिराजवळ ओव्हरटेक करण्याच्या नादात बोलेरो आणि दोन मोटारसायकल यांच्यात झालेला विचित्र अपघातात दोन ठार व एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
रविवार (दि़१४) दुपारी २ च्या सुमारास मनमाड दिशेकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एमएच ४२ एन-४७७३ या बोलेरो गाडीने मनमाडकडे जाणाऱ्या एमएच १५ डीपी-५२० या लाल रंगाच्या मोटरसायकलला ओव्हरटेक करण्याच्या नादात धडक दिली. दरम्यान, समोरून येवल्याच्या दिशेने येणाऱ्या एमएच १५ डीजे ५३३१ या प्लॅटिना गाडीलाही बोलेरोने धडक दिली. या भीषण धडकेत वाल्मीक सुखदेव सालमुठे (४२), रा़साबरवाडी व अक्षय रामभाऊ पुणे (४०) हे दोघेजण ठार झाले, तर शंकर प्रल्हाद कोटमे हा गंभीर जखमी झाला आहे. घटना घडली तेव्हा संभाजीराजे पवार, रवि काळे हे आपल्या गाडीने सावरगावकडे चालले होते. त्यांनी तत्काळ अपघातग्रस्थांना आपल्या वाहनासह रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात पोहचवले. डॉ. ओम जाधव यांनी दोघांना मृत असल्याचे घोषित केले, तर एका गंभीर जखमीस उपचारासाठी नाशिकला पाठविण्यात आले आहे. (वार्ताहर)