चांदवड चौफुलीवर कंटेनरच्या विचित्र अपघातात दोन जखमी

By Admin | Updated: June 30, 2014 00:39 IST2014-06-30T00:39:13+5:302014-06-30T00:39:43+5:30

चांदवड चौफुलीवर कंटेनरच्या विचित्र अपघातात दोन जखमी

Two injured in a strange accident of container on Chandwad Chaupuli | चांदवड चौफुलीवर कंटेनरच्या विचित्र अपघातात दोन जखमी

चांदवड चौफुलीवर कंटेनरच्या विचित्र अपघातात दोन जखमी

चांदवड - येथील पेट्रोलपंप चौफुलीवर दोन कंटेनरचा विचित्र अपघात झाला, तर मनमाडकडे वळण घेणाऱ्या कंटेनरचे पुढील तोंड विचित्र पद्धतीने तुटून विरुद्ध बाजुला गेले या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून, मुंबई आग्रारोडवरील चौफुलीवरील महाकाय कंटेनर काढण्यासाठी तेवढ्या क्षमतेचा क्रेन उपलब्ध न झाल्याने दोन्ही अपघातग्रस्त कंटेनर सुमारे १८ तास तसेच पडून होते तर वाहतूक ही पर्यायी रोडने काढण्यात आली.
शनिवार दि. २८ जून रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास मालेगावकडून येणारा कंटेनर (क्रमांक एम.एच. ४६ एच/ २८६३) हा भरधाव वेगाने येताना नाशिककडून मोठे वजनदार पाइप भरून मनमाडकडे वळण घेणारा कंटेनर (क्रमांक जी.जे. १२ /झेड. १५४३) यास धडक दिल्याने मालेगावकडून येणाऱ्या कंटेनरचा चालक ज्ञानेश्वर राजेंद्र खेडकर, शरद राजेंद्र खेडकर हे दोघे गंभीर जखमी झाले त्यांच्यावर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी नाशिकला रवाना करण्यात आले. दुसऱ्या कंटेनरमधील चालक व वाहक पळून गेले. चांदवड पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन मगर, जमादार एम. के. बर्डे, एन. डी. शिरसाठ हे करीत आहेत. मात्र रात्री ११ वाजता हा अपघात झाला याच ठिकाणी चांदवड चौफुलीवर अनेक काळी पिवळी वाहने प्रवासी भरतात मात्र सुदैवाने रात्र असल्याने कोणतेही वाहन रस्त्यात नव्हते तर हा अपघातातील महाकाय कंटेनर काढण्यासाठी तेवढ्या क्षमतेचे क्रेन नसल्याने दोन्ही कंटेनर सुमारे १८ तास तसेच पडून होते, तर नाशिककडील वाहतूक दिवसभर पर्यायी बायपास रस्त्याने वळविली. (वार्ताहर)

Web Title: Two injured in a strange accident of container on Chandwad Chaupuli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.