रामनाथ शेळके हे बुधवारी सकाळी नित्यनियमाप्रमाणे आपल्या शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांच्या शेतालगत असणाऱ्या पाझर तलावाच्या मोरीत बिबट्याचा शिरकाव करताना त्यांनी पाहिले. त्यानंतर शेळके यांनी मदत करण्यासाठी गावातील मित्रांना भ्रमणध्वनीद्वारे बोलावले. मित्र येईपर्यंत मोरीच्या बाहेरच्या बाजूस काट्या टाकण्याचा प्रयत्न करताना शेळके यांच्यावर बिबट्याने पाठीमागच्या बाजूने कमरेला चावा घेतला. त्यानंतर तिथून बिबट्याने धूम ठोकली व पांगरी शिवाराच्या दिशेने पलायन केले. शेळके यांच्या पाठीवर व कमरेजवळ बिबट्याचे दात घुसले आहेत. त्यांच्यावर दोडी ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर परदेशी यांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. यापूर्वीही म-हळ खुर्द शिवारात संतोष म्हस्के यांना बिबट्याने दर्शन दिले होते. या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रविण सोनवणे यांना देण्यात आली. तरी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
म-हळ शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 18:47 IST