येवल्यात दोन अपक्षांचे अर्ज अवैध
By Admin | Updated: September 29, 2014 22:53 IST2014-09-29T22:52:54+5:302014-09-29T22:53:05+5:30
येवल्यात दोन अपक्षांचे अर्ज अवैध

येवल्यात दोन अपक्षांचे अर्ज अवैध
येवला : येवला विधानसभा मतदारसंघात सोमवारी उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशी दोन अपक्ष उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले. १७ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले आहे.
प्रवीण भाऊसाहेब मढवई यांनी बहुजन समाज पक्षाच्या वतीने दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबत एबी फॉर्म जोडलेला नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला. भागवत सोनवणे यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जातील काही रकाने परिपूर्ण भरले नसल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला. कॉँग्रेसचे उमेदवार निवृत्ती (तात्या) लहरे यांच्या उमेदवारी अर्जासोबत शपथपत्र मुद्रांक खरेदी केले त्या जागी स्वाक्षरी नाही, अशी लेखी हरकत राष्ट्रवादीचे अॅड. माणिकराव शिंदे यांनी घेतली. दोन्ही बाजूच्या वतीने तासभर युक्तिवाद करण्यात आला.
उमेदवार तात्या लहरे यांनी स्वत: युक्तिवाद करताना स्टॅम्प पेपरवर जरी स्वाक्षरी नसली तरी स्टॅम्पवेंडरकडे असलेल्या रजिस्टरवर स्वाक्षरी आहे. यावर नोंदणीक्र मांकदेखील आहे. प्रतिज्ञापत्र सादर करताना स्टॅम्पपेपर वापरण्याची गरज नाही. साध्या कागदावरदेखील सादर करता येते, असे निवडणूक निर्णय अधिकारी वासंती माळी यांना सांगितले. सुमारे तासाभरानंतर तांत्रिक बाब असल्याचे निकालपत्रकात नमूद करून हरकत फेटाळण्यात आली व तात्या लहरे यांचा अर्ज वैध ठरवण्यात आल्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिला. या निकालाचा निर्णय काय येतो? हे ऐकण्यासाठी सर्वच पक्षाचे कार्यकर्ते तहसील आवारात उपस्थित होते. पौलस आहिरे, (बसपा), छगन भुजबळ (राष्ट्रवादी), संभाजी पवार (शिवसेना), मानकर शिवाजी (भाजप), निवृत्ती लहरे (भारतीय राष्ट्रीय कॉँगे्रस), दीपक लाठे (बहुजन मुक्ती पार्टी), संजय सोनवणे (आंबेडकर पार्टी आॅफ इंडिया).
याशिवाय अपक्ष उमेदवार म्हणून नयन कुशारे, गुलामनबी खाटिक, अभिजित गायकवाड, सुनील घोडेराव, दत्तात्रेय चव्हाण, पुष्पा बनसोडे, अशोक मोहारे, शेख अ. वहाब, नारायण साबळे, रणजीत संसारे यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले.