मालेगावी दुचाकी चोरीच्या दोन घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:14 IST2021-05-10T04:14:13+5:302021-05-10T04:14:13+5:30
मालेगाव : शहरातील दुचाकी चोरीच्या दोन घटना घडल्या असून, यामुळेे दुचाकीस्वारांमध्ये घबराट पसरली आहे. पोलिसांनी दुचाकी चोरट्यांचा ...

मालेगावी दुचाकी चोरीच्या दोन घटना
मालेगाव : शहरातील दुचाकी चोरीच्या दोन घटना घडल्या असून, यामुळेे दुचाकीस्वारांमध्ये घबराट पसरली आहे. पोलिसांनी दुचाकी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
चंदनपुरी गेटजवळील रसुलपुरा भागातून चोरट्याने २५ हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची डीलक्स दुचाकी क्रमांक (एमएच ४१ एएच ५७१४) चोरून नेली. वेल्डिंगचे काम करणारे कलीम अहमद हाजी मोहमद इस्माईल (३०) यांनी किल्ला पोलिसात याविषयीची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास उपनिरीक्षक खरगे करत आहेत. दुसऱ्या घटनेत अन्सार कॉलनीत कुबा मशिदीजवळून चोरट्याने हिरो कंपनीची डीलक्स क्रमांक (एमएच.४१ एडब्ल्यू ५४२६) ही २५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. शाहिद अख्तर एजाज अहमद (रा. अन्सार कॉलनी, कुबा मशिदीजवळ) यांनी आयेशा नगर पोलिसात याविषयीची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास उपनिरीक्षक वाघमोडे करत आहेत.