दोनशे वर्षांची परंपरा : बाशिंगे दाजीबा विराची पारंपरिक मिरवणूक
By Admin | Updated: March 13, 2017 20:24 IST2017-03-13T17:51:33+5:302017-03-13T20:24:10+5:30
धुलीवंदनाला दरवर्षी मुळ नाशिक अर्थात जुने नाशिक परिसरातून बाशिंगे दाजीबा विराची मिरवणूक पारंपरिक पध्दतीने काढली जाते.

दोनशे वर्षांची परंपरा : बाशिंगे दाजीबा विराची पारंपरिक मिरवणूक
नाशिक : धुलीवंदनाला दरवर्षी मुळ नाशिक अर्थात जुने नाशिक परिसरातून बाशिंगे दाजीबा विराची मिरवणूक पारंपरिक पध्दतीने काढली जाते. या मिरवणूकीमागे अख्यायिका व दोनशे वर्षांची परंपरा आहे. सोमवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास वाजतगाजत बुधवार पेठेतून मिरवणूकीला प्रारंभ करण्यात आला. दाजीबा वीराचे मानकरी असलेले अमीत बेलगावकर यांना पारंपरिक पोशाखाने सजविण्यात आले होते.
अंगाला हळद लागलेला नवरदेवाला मृत्यू आला आणि त्याची लग्नाची इच्छा अपूर्णच राहिली. यामुळे डोक्यावर देवाचा मुकुट अन् बाशिंग बांधून अंगाला हळद लावून आपल्या होणाऱ्या पत्नीच्या शोधात फिरतो, अशी कथा व अख्यायिका या पारंपरिक मिरवणूकीमागे आहे.
बुधवारपेठेतून वाजत गाजत निघालेल्या या मिरवणूकीचा समारोप पहाटेच्या सुमारास होणार असून संपुर्ण जुने नाशिक परिसरातील गल्लीबोळातून मिरवणूक मार्गक्रमण करते. यावेळी दाजीबा बाशिंगे वीरासोबत बहुसंख्य भाविक नृत्य करत असतात. सुवासिनींकडून या वीराची ठिकठिकाणी पूजा केली जाते. धुलीवंदनाच्या दिवशी दाजिबा बाशिंगे विराची मिरवणूक आकर्षण असते.