दोनशे रुपये रोज, एक वेळचे जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:58 IST2017-11-07T00:58:51+5:302017-11-07T00:58:58+5:30

तालुक्याच्या पूर्व भागात भाताची सोंगणी जोमात सुरू झाल्याने मजुरांचा तुटवडा निर्माण झाला आहे. टाकेद भागात दोनशे रुपये व एक वेळचे जेवण व जेवण नसेल तर दोनशे पन्नास रूपये मजुरी दिली जात आहे. त्यातच कृषी विभागाने फक्त भात कापणीसाठी विकसित केलेले कापणीयंत्र सहाशे रुपये तासाने या परिसरात उपलब्ध झाल्याने या यंत्राला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.

 Two hundred rupees per day, one meal a day | दोनशे रुपये रोज, एक वेळचे जेवण

दोनशे रुपये रोज, एक वेळचे जेवण

सर्वतीर्थ टाकेद : तालुक्याच्या पूर्व भागात भाताची सोंगणी जोमात सुरू झाल्याने मजुरांचा तुटवडा निर्माण झाला आहे. टाकेद भागात दोनशे रुपये व एक वेळचे जेवण व जेवण नसेल तर दोनशे पन्नास रूपये मजुरी दिली जात आहे. त्यातच कृषी विभागाने फक्त भात कापणीसाठी विकसित केलेले कापणीयंत्र सहाशे रुपये तासाने या परिसरात उपलब्ध झाल्याने या यंत्राला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. या वर्षी सुरवातीपासुनच पावसाची सुरुवात चांगली झाली . ब-याच वर्षांनी पावसाने बळीराजाची दानादान ऊडवुन दिली. कवडदरा, धामनगाव , पिंपळगाव डुकरा , टाकेद परिसरामध्ये काही भागात नुकत्याच दिवाळीच्या सणामघ्ये पावसाने हजेरी लावल्याने हातातोंडाशी आलेला घास काही प्रमानात निसर्गाने हिसकाऊन घेतला . कवडदरा व अडसरा व टाकेदच्या काही भागातील शेतक-यांच्या भातपकावर आळीचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक शेतक-यांचे मोठ्या प्रमानात नुकसान झाले आहे. या भागाकडे कृषी विभागाने काळजी पुर्वक लक्ष देण्याची गरज आहे असे सरपंच बाळासाहेब घोरपडे यांनी सांगितले. या यंत्राने जरी भात कापनी केली तरी धान्य वेगळे करण्यासाठी मजुरांचीच गरज लागत आहे.  या भागात हार्वेस्टरही आहे. परंतु भात शेतीचे प्रमाण जास्त व मजुरांचे प्रमाण कमी आहे . यंत्रही कमी आहेत या मुळे शेतक-यांची धावपळ होत आहे.सध्या या भागात आर २४ ची लागवड कमी झाली आहे.पण अनेक प्रकारच्या नवनवीण भाताच्या जाती विकषीत झाल्याने उत्पन्नातही भर पडत आहे.या भागात इंद्रायनी.जय श्रीराम एक हजार आठ. ओम थ्री, रूपाली, सोनम व ज्ञानेश्वरी, दप्तरी इत्यादी भाताच्या वानांची पिके आलेली आहेत.

Web Title:  Two hundred rupees per day, one meal a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.