उपनगरला दोन घरफोड्यांमध्ये पन्नास हजारांचा ऐवज लंपास

By Admin | Updated: April 8, 2017 16:58 IST2017-04-08T16:58:52+5:302017-04-08T16:58:52+5:30

उपनगरला दोन घरफोड्यांमध्ये पन्नास हजारांचा ऐवज लंपास

In the two houses of the suburb, there are fifty thousand rupees lumpas | उपनगरला दोन घरफोड्यांमध्ये पन्नास हजारांचा ऐवज लंपास

उपनगरला दोन घरफोड्यांमध्ये पन्नास हजारांचा ऐवज लंपास

नाशिक : उपनगर पोलीस ठाणे हद्दीत चोरी व घरफोडीची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, दोन घटनांमध्ये चोरट्यांनी पन्नास हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे़
शैलेश डी. कटकमवार (रा. बॉम्बे हाउस सोसायटी, उपनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी (दि़६) मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या किचनमधील उघड्या खिडकीतून प्रवेश करून २५ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरून नेला़ त्यामध्ये पाच मोबाइल, महत्त्वाची कागदपत्रे, रोख रकमेचा समावेश आहे़ याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दुसरी घटना टाकळी रोडवरील अपूर्वा कॉलनीत घडली़ रमेश कचरू बस्ते यांच्या घरातील किचनच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी घरात प्रवेश केला़ तसेच घरातील २२ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली़ याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: In the two houses of the suburb, there are fifty thousand rupees lumpas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.