शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
4
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
5
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
6
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
7
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
8
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
9
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
10
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
11
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
12
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
13
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
14
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
15
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
16
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
17
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
18
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
19
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
20
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली

मातोरीत दोन घरे आगीत भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 17:30 IST

नाशिक : गावात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत कोळीवाड्यातील दोन घरे भस्मसात झाली. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले सिलिंडर गरम झाले; मात्र तत्काळ सिलिंडर ...

ठळक मुद्देशॉर्टसर्किट होऊन आग भडकली.

नाशिक : गावात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत कोळीवाड्यातील दोन घरे भस्मसात झाली. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले सिलिंडर गरम झाले; मात्र तत्काळ सिलिंडर आगीतून बाहेर काढण्यात आल्याने संभाव्य स्फोट टळला, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या दुर्घटनेत कुठल्याहीप्रकारची जीवीतहानी झालेली नाही.मातोरी गावात गुरु वारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास योगेश भडीगे यांच्या घरात विजेच्या वायरने अचानक पेट घेतल्याने घरातील विद्युत उपकरणांसह संसार पूर्ण जळून खाक झाला तर शेजारील खंडू भडीगे यांच्या घराच्यादिशेनही आग पसरल्याने त्यांचेही घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यावेळी कुटुंबातील महिला वर्गाकडून नेहमीप्रमाणे सकाळचा स्वयंपाक सुरू होता. अचानकपणे खोलीतून धूराचे लोट उठत असल्याचे लक्षात येताच कुटुंबियांनी घराबाहेर धाव घेतली. क्षणार्धात आगीने रौद्रावतार धारण केल्याने घरातील गादी व इतर कपड्यांनी पेट घेतला. यावेळी गावकऱ्यांनी जमेल त्या बाजूने पाणी फेकून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला; मात्र आग आटोक्यात येत नव्हती. अखेर स्थानिकांच्या मदतीने घरावरील काही कौल काढून घेत आतमध्ये भडकलेल्या ज्वालांवर पाण्याचा मारा करून आग विझविण्यास गावकऱ्यांना विशेषत: तरुणांना यश आले. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील रमेश पिंगळे तलाठी कोकाटे यांना कळवताच त्यांनी जागेवर येत पंचनामा केला तसेच आगीत मोठे आर्थिक नुकसान झाल्याने या कुटुंबियांची राहण्याची सोय समाज मंदिरात करावी अशी मागणी बाळू चारस्कर यांनी ग्रामपंचायतकडे केली असता ग्रामसेवक सुनील चौधरी यांनी या कुटुंबास किराणा भरून देत त्यांच्या राहण्याची सोय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरात केली.मिक्सर ठरला आगीचा स्त्रोतघरातील मिक्सर ज्या विद्युत बोर्डात लावण्यात आला होता. त्या ठिकाणी शॉर्टसर्किट होऊन आग भडकली. मिक्सरचा विद्युतपुरवठा यावेळी सुरूच होता, असेही प्रथमदर्शनी समोर आले आहे. या भडकलेल्या आगीत सिलिंडरचा स्फोट झाला असता तर मोठा अनर्थ झाला असता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

 

टॅग्स :Nashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलAccidentअपघात