बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 22:41 IST2020-01-03T22:40:38+5:302020-01-03T22:41:29+5:30

सांगळे वस्तीवर बुधवारी रात्री बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या.

Two goats killed in raid | बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार

बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार

नायगाव : येथील सांगळे वस्तीवर बुधवारी रात्री बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या. शिवाजी भीमाजी सांगळे यांनी त्यांच्या गोठ्यात शेळ्या बांधल्या होत्या. पाच फूट उंच असलेल्या भिंतीवरून उडी घेत बिबट्याने गोठ्यात प्रवेश केला. दोन शेळ्या ठार केले, तर एक शेळी जखमी झाली. शेतकऱ्यास नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. या घटनेने परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.

Web Title: Two goats killed in raid