पाडगणला दोन शेळ्या फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 23:55 IST2019-04-02T23:54:49+5:302019-04-02T23:55:03+5:30
जायखेडा : येथील पाडगण शिवारातील शेतकरी रमेश पुंडलिक अहिरे यांच्या गोठ्यामध्ये बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून दोन शेळ्या फस्त केल्या. यामुळे शिवारातील ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पाडगणला दोन शेळ्या फस्त
जायखेडा : येथील पाडगण शिवारातील शेतकरी रमेश पुंडलिक अहिरे यांच्या गोठ्यामध्ये बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून दोन शेळ्या फस्त केल्या. यामुळे शिवारातील ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. वनविभागाने
बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
जायखेडा येथील ग्रा. पं. माजी सदस्य रमेश पुंडलिक अहिरे यांच्या पाडगण शिवारातील शेतातील बंदिस्त गोठ्यामध्ये शेळ्या बांधलेल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने आत प्रवेश करून दोन शेळ्या फस्त केल्या. सकाळी रमेश अहिरे हे शेळ्यांना चारा-पाणी करण्यासाठी गेले असता, गोठ्यात शेळ्या मृतावस्थेत आढळून आल्या. अहिरे यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलविले. रात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेळ्या ठार झाल्याचे निष्पन्न झाले. यावेळी शेतकऱ्यांनी वनविभागाच्या कर्मचाºयांना माहिती दिली. वनरक्षक सोनवणे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. वनविभागाने शेतकºयाला शासनाकडून भरपाई मिळवून द्यावी व बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.
इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुºहे येथे बिबट्या पकडण्यात आले. लष्करी हद्दीजवळ असलेल्या पोल्ट्रीफार्ममध्ये अडकलेल्या बिबट्याला चार तासांच्या रेस्क्यूनंतर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. या घटनेमुळे वनकर्मचाºयांसह ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. होता. मात्र पाडगणला बिबट्याचा संचार असल्याने ग्रामस्थांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे. जायखेडा परिसरातील बिबट्या पकडला तर नागरिकांची भीती दूर होईल, असे मत व्यक्त होत आहे.शेतकºयांनी घराबाहेर पडताना दिवसा उजेडातच बाहेर पडावे, शेतामध्ये जाताना आवाज करीत, गाणी वाजवत जावे, एकटे बाहेर पडू नये तसेच जनावरे बंदिस्त जागेत बांधावीत, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.