शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

लुटीच्या बनावप्रकरणी फरार दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 01:14 IST

मुंबईनाका येथे कारची काच फोडून १५ लाखांची लूट झाल्याचा बनाव केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी फरार दोघा संशयितांना रविवारी (दि. ७) अटक केली आहे. या गुन्ह्यात फिर्यादी व त्याचा मित्रच संशयित आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

ठळक मुद्देपोलीस कोठडी : आयकर विभागाला पोलीस देणार पत्र

नाशिक : मुंबईनाका येथे कारची काच फोडून १५ लाखांची लूट झाल्याचा बनाव केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी फरार दोघा संशयितांना रविवारी (दि. ७) अटक केली आहे. या गुन्ह्यात फिर्यादी व त्याचा मित्रच संशयित आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. रोलेट व्यावसायिकाची रक्कम लांबविण्याच्या उद्देशाने त्यांनी संगनमत करून जबरी लूट झाल्याचा बनाव शुक्रवारी केला होता. या गुन्ह्यात आता एकूण चौघांना अटक करण्यास आली आहे. त्यापैकी न्यायालयाने संशयित मयूर राजेंद्र भालेराव (२५, रा. तिवंधा चौक),राम सुंदर शिंदे यांना बुधवारपर्यंत (दि.१०) पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्यात संशयित मयूरने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी (दि.६) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास मुंबई नाका परिसरातील छान हॉटेलजवळ कारची काच फोडून १५ लाख रुपयांची रोकड पल्सर दुचाकीने आलेल्या चोरट्यांनी  लुटून नेल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्यानंतर पोलिसांच्या तपासात केल्यानंतर मयुरने त्याच्या साथीदारांच्या मदतीने जबरी लुटीचा बनाव रचल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी मयूर व रामला सुरुवातीला बेड्या ठोकल्या. त्यांनी जुन्या भांडणाचा राग धरत वचपा काढण्यासाठी कैलास शहा याने दिलेली रक्कम लांबविण्यासाठी षङ्‌यंत्र रचल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांचे उर्वरित फरार साथीदार संशयित पवन पुजारी व अनिकेत कांबळे या दोघांना रविवारी पोलिसांनी अटक केली. मयूरने हे पैसे त्याचा जोडीदार रोलेटचा बुकी कैलास शहा याच्यासोबत वाद झाल्यानंतर वचपा काढण्यासाठी चोरल्याचे पोलीस तपासात समोर आले. दरम्यान, संशयितांकडून जप्त केलेली रोकड कोणत्या व्यवहारातून आली आहे याचा तपास करण्यासाठी आयकर विभागास पत्र देणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी