नामपूरच्या दोन शेतकऱ्यांना अटक
By Admin | Updated: June 5, 2017 00:26 IST2017-06-05T00:22:39+5:302017-06-05T00:26:02+5:30
नामपूर : शेतकरी संपाचा आज चौथा दिवस असून परिसरात शेतमाल विक्रीस अजूनही बंदीच आहे

नामपूरच्या दोन शेतकऱ्यांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नामपूर : शेतकरी संपाचा आज चौथा दिवस असूनही शासनस्तरावर जो निर्णय झाला तो नामपूरच्या शेतकऱ्यांना मान्य नसल्यामुळे परिसरात शेतमाल विक्रीस अजूनही बंदीच असून, यामुळे भाजीपाला ,दूध सारख्या जीवनावश्यक वस्तुच्या किमती खुप वाडल्या आहेत .शनिवार दी ३ जून रोजी रात्री १० वाजता नामपुर येथिल सामाजिक कार्यकर्ते शेतकरी डॉ नरेश गायकवाड ,नितिन काकडे याना पोलिसानी पकडून मालेगाव येथे रवाना केले असून .परिसरातील अनेक शेतकर्याना अजून धरपकड सुरूच असून .पोलिस यत्रनेच्या या भूमिकेमुळे परिसरातील शेतकर्यात संतापाची लाट निर्माण झाली असून . दरम्यान हा संप अधिक तिव्र करण्यासाठी नामपुरचा सोमवारचा आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.