शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसाआड एकाचा अपघाती मृत्यू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:22 IST

वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाढती वाहनसंख्या, अरुंद रस्ते, वाहनधारकांकडून सुरक्षितता व वाहतूक नियमांची केली जाणारी सर्रास पायमल्ली यामुळे शहरात दोन दिवसाआड एक जीवघेणा अपघात होत असल्याचे पोलिसांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे़

विजय मोरे ।नाशिक : वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाढती वाहनसंख्या, अरुंद रस्ते, वाहनधारकांकडून सुरक्षितता व वाहतूक नियमांची केली जाणारी सर्रास पायमल्ली यामुळे शहरात दोन दिवसाआड एक जीवघेणा अपघात होत असल्याचे पोलिसांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे़ १ जानेवारी ते २५ डिसेंबर २०१७ या कालावधीत शहरात १६३ जीवघेणे अपघात झाले असून, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १४ ने वाढ झाली आहे़ प्रत्येक महिन्यात किमान १५ जीवघेणे अपघात होत असून, यात मृत्युमुखी पडणाºयांमध्ये तरुणाईचे प्रमाण सर्वाधिक आहे़ वाढती अपघातांची संख्या लक्षात घेता ‘स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक’बरोबर ‘सुरक्षित नाशिक’चाही विचार करणे गरजेचे झाले आहे़  शहरातील वाढत्या अपघातांच्या संख्येमुळे शहर दिवसेंदिवस ‘अनसेफ ’ होत चालले की काय अशी शंका निर्माण होणे साहजिकच आहे़ गतवर्षी शहरात १४९ जीवघेणे अपघात घडले होते, तर यावर्षी २५ डिसेंबरपर्यंत १६३ जीवघेणे अपघात घडले आहेत़ यामध्ये दुचाकी अपघातांचे व दुचाकीस्वारांचा मृत्यू होण्याची संख्या तुलनेने अधिक आहे़ डोक्याला मार लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याचे समोर आले असून, दुचाकी वाहन चालविताना हेल्मेट आणि चारचाकी वाहन चालविताना सीट बेल्ट वापरणे आवश्यक असते़ यासाठी शहरात पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या आदेशानुसार वर्षभरापासून हेल्मेट व सीट बेल्ट न वापरणाºयांवर दंडात्मक कारवाई केली जाते आहे़  वर्षानुवर्षे काही वाहनधारक वाहनांची देखभाल दुरुस्तीच करीत नाहीत़ कार्यालयातून घरी जाणाºया नोकरदारांची होणारी घाईगर्दी, बंद सिग्नल, सिग्नलची सदोष यंत्रणा, पोलीस कर्मचाºयांचे दुर्लक्ष आणि वाहनधारकांकडून होणारे नियमांचे उल्लंघन यामुळे शहरातील सिग्नलवरील किरकोळ अपघातांमध्येही वाढ झाली आहे़ मानवी चुकांमुळे  ८४ टक्के अपघात देशात रस्ते अपघातात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो़ प्रत्येक दिवशी सरासरी ४० लोक मरण पावतात़ अपघातात मृतांच्या संख्येपैकी सुमारे ५० टक्के मृत्यू हे २० ते ४० या वयोगटातील तरुण असतात़ यातील महत्त्वाची बाब म्हणजे ८४ टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे झाल्याचे चौकशीअंती समोर आले आहे़ महाराष्ट्रात सर्वाधिक अपघात हे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, मुंबई-नाशिक, मुंबई-गोवा, कल्याण-नगर-बीड, पुणे-नाशिक, पुणे-सोलापूर, नगर-औरंगाबाद या महामार्गावरील रस्त्यांवर होत असून, यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे़

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिक