शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

वृक्षांवरील फलक हटविण्यासाठी दोन दिवसांची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 01:36 IST

व्यवसायाच्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी झाडांना जखमी करून त्यावर फलक लावणाऱ्यांबाबत लोकमतने वृत्त दिल्यानंतर महापालिकेलाही आता जागृत झाली असून, अशाप्रकारे कारवाई करणाऱ्यांना नोटिसा बजावून कारवाईस सुरुवात करण्यात आली आहे. याशिवाय बेकायदा फलक लावणाऱ्यांचे फलक जप्त करण्याबरोबरच आता फौजदारी करवाईदेखील करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. फलक हटविण्यासाठी या व्यावसायिकांना दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

ठळक मुद्देफलकबाजांना तंबी : महापालिका पोलिसांत गुन्हे दाखल करणार

नाशिक : व्यवसायाच्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी झाडांना जखमी करून त्यावर फलक लावणाऱ्यांबाबत लोकमतने वृत्त दिल्यानंतर महापालिकेलाही आता जागृत झाली असून, अशाप्रकारे कारवाई करणाऱ्यांना नोटिसा बजावून कारवाईस सुरुवात करण्यात आली आहे. याशिवाय बेकायदा फलक लावणाऱ्यांचे फलक जप्त करण्याबरोबरच आता फौजदारी करवाईदेखील करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. फलक हटविण्यासाठी या व्यावसायिकांना दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.शहरात फलक बाजांचे पेव फुटले असून, सार्वजनिक आणि खासगी मिळकतींवर फलक लावले जातातच, परंतु झाडांवरदेखील फलक लावले जातात केवळ झाडावर फलक टांगण्यासाठी बरोबरच झाडांना खिळे ठोकून झाडांना जखमी केले जाते. हजारो झाडावर अशाप्रकारे फलक लावून ते जायबंदी केले जात असताना महापालिका आणि पर्यावरणप्रेमींचे दुर्लक्ष असते. त्यासंदर्भात लोकमतने गेल्या दि. २५ फेब्रुवारीस ‘व्यवसायाच्या वाढीची हाव, झाडांवर घाव’ या विशेष पानात महापालिकेच्या दुर्लक्षाबाबत माहिती दिली होती. त्यानंतर मानव उत्थान संस्थेच्या कार्यकर्त्यांनी स्वत:हून अशाप्रकरचे फलक हटविले होते, तर महापालिकेने काही व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या होत्या. मात्र गुरुवारी (दि.१४) महापालिकेने अशाप्रकारच्या जाहिरात करणाºयांना तंबी दिली आहे.महानगरपालिकेने जाहिराती लावण्यास विविध जागा, अटी-शर्ती व नियम ठरवून दिलेले आहेत, सदर नियमांचे पालन करून मनपाची रितसर पूर्वपरवानगी घेऊनच जाहिराती, बोर्ड व फलक उभारणे आवश्यक असतानाही अशा प्रकारच्या परवानगी घेतल्याचे आढळून येत नाही.त्यामुळे नाशिक शहरामध्ये विविध ठिकाणी अशाप्रकारे विनापरवानगी, अनधिकृतपणे जाहिराती, बोर्ड, फलक लावणाºया संबंधित नागरिक, व्यावसायिक, रहिवासी व दुकानदार यांनी आपापल्या जाहिराती, बोर्ड, फलक इत्यादी हे तत्काळ दोन दिवसांचे आत स्वत:हून काढून घ्यावेत अन्यथा तद्नंतर मनपामार्फत सदरचे बोर्ड, जाहिराती, फलक हे जप्त करण्यात येतील व संबंधितांविरु द्ध महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींप्रमाणे व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (जाहिरात व फलक नियंत्रण) नियम २००३ आणि महाराष्ट्र प्रिव्हेंशन आॅफ डिफेंसमेंट आॅफ प्रॉपर्टी अ‍ॅक्ट १९९५चे तरतुदी अन्वये पोलीस विभागात गुन्हे दाखल करण्यात येतील अशी तंबी महापालिकेने दिली आहे. नागरीकांनी वृक्षांवर जाहिरात करणाºयांबाबत विभागीय कार्यालय किंवा महापालिकेच्या अ‍ॅपवर तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे.वृक्षांवर रोषणाईला मनाईमनपाच्या उद्यान विभागाने वृक्षांवर जाहिरात फलकच नव्हे तर विद्युत रोषणाई करण्यास देखील मनाई केली आहे. शहराच्या अनेक भागात हॉटेल व्यावसायिक रोषणाई करतात किंवा झाडांना तारा बांधतात, त्या काढून घेण्याचे निर्देश दिले असून संबंधीतांच्या विरोधात आर्थिक दंड आणि अन्य कारवाई करणार आहे़

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाpollutionप्रदूषण