शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

विल्होळी शिवारात दोन कंपन्यांना आग; लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 18:31 IST

होळी परिसरातील अंबड-बिल्लोरी रस्त्यावरील ए.आर व स्क्रॅप जंक्शन या कंपन्यांच्या परिसरातील साहित्य पेटल्याची घटना घडली

ठळक मुद्देअर्धा तासानंतर सिडको उपकेंद्राचा बंबासह जवान घटनास्थळी दाखलटॅँकरच्या मदतीने आगीवर पाणी फेकत नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला

नाशिक : विल्होळी गावाच्या शिवारात अंबड-बिल्लोरी रस्त्यावरील असलेल्या दोन कंपन्यांना अचानकपणे आग लागल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले. अग्नीशमन दलाने वेळीच धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. अग्नीशमन दलाचे बंब घटनास्थळी उशिरा पोहचल्याने आगीने रौद्रावतार धारण केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, होळी परिसरातील अंबड-बिल्लोरी रस्त्यावरील ए.आर व स्क्रॅप जंक्शन या कंपन्यांच्या परिसरातील साहित्य पेटल्याची घटना घडली. सकाळच्या सुमारास उघड्यावर नैसर्गिक विधीसाठी गेलेल्यांपैकी कोणीतरी अज्ञात इसमाने धुम्रपान करताना जळती आगकाडी अथवा बिडी, सिगारेटचे थोटके खाली फेकून दिल्यामुळे वाळलेले गवत पेटत-पेटत दोन्ही कंपन्यांच्या आवारापर्यंत पोहचले. यावेळी कंपन्यांच्या आवारात असलेल्या टायरसारख्या टाकाऊ साहित्याने पेट घेतल्याने आगीने क्षणार्धात रौद्रावतार धारण केला. यावेळी तत्काळ परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. घटनेची माहिती अग्नीशमन दलाला कळविण्यात आली. त्यानंतर सुमारे अर्धा तासानंतर सिडको उपकेंद्राचा बंबासह जवान घटनास्थळी दाखल झाले. तत्पुर्वी स्थानिक नागरिकांनी टॅँकरच्या मदतीने आगीवर पाणी फेकत नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. सिडको बंबाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न क रूनही आग आटोक्यात येत नव्हती, तसेच बंबामधील पाण्याचा साठाही संपत आल्यामुळे तत्काळ सातपूर उपकेंद्राची मदत मागितली गेली. काही वेळेत सातपूरचा बंब घटनास्थळी पोहचला. त्यावेळी जवानांनी पाण्याचा मारा करत आग विझविली.अंबड औद्योगिक वसाहत घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर असून महापालिका व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करून या औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्ररित्या नवीन अग्नीशमन उपकेंद्र स्थापन करण्याची गरज असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :Nashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलfireआगNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका