इंदिरानगरला दोघांची तर अंबडला एका युवतीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:11 IST2021-06-19T04:11:02+5:302021-06-19T04:11:02+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आकांक्षा सुभाष बोडके (२०, रा शिवाजी चौक, पाथर्डी गाव) या युवतीने ...

Two committed suicide in Indiranagar and one in Ambad | इंदिरानगरला दोघांची तर अंबडला एका युवतीची आत्महत्या

इंदिरानगरला दोघांची तर अंबडला एका युवतीची आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आकांक्षा सुभाष बोडके (२०, रा शिवाजी चौक, पाथर्डी गाव) या युवतीने लोखंडी अँगलला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर कुणाल सतीश पाटील (३२,रा. जिल्हा परिषद कॉलनी, चर्वाक चौक, इंदिरानगर ) या तरुणाने राहत्या घरात छताच्या पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेतला. ही घटना त्याची आई अनिता सतीश पाटील हिच्या लक्षात येतात त्यांनी कुणालला खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात दाखल केले . या ठिकाणी डॉ. धूम यांनी त्याला तपासून मयत घोषित केले. त्याचप्रमाणे तिसरी घटना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. साक्षी अमित शिंदे (२३) रा. श्रीजी अपार्टमेंट खुटवटनगर ) या युवतीने गुरुवारी (दि.१७ राहत्या घरात छताच्या फॅनला साडीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही घटना लक्षात येताच तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉ. धूम यांनी तिला तपासून मयत घोषित केले. या तिनही प्रकरणात आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Two committed suicide in Indiranagar and one in Ambad