दुचाकींच्या धडकेमध्ये बालक जागीच ठार
By Admin | Updated: April 20, 2015 01:49 IST2015-04-20T01:48:57+5:302015-04-20T01:49:21+5:30
दुचाकींच्या धडकेमध्ये बालक जागीच ठार

दुचाकींच्या धडकेमध्ये बालक जागीच ठार
देवळाली कॅम्प : भगूर-लहवित रस्त्यावर बलकवडे राईस मिलसमोर दोन दुचाकींच्या झालेल्या धडकेमध्ये सहावर्षीय बालक जागीच ठार झाले. रविवारी रात्री ८.३० च्या सुमारस हा अपघात झाला. संतोष दशरथ अहेर हे आपला मुलगा ओम याच्यासह लहवितकडून भगूरकडे जात होते. त्याचवेळी रोहन नंदकुमार कुंडारिया हे भगूरकडून लहवितकडे मोटारसायकलने जात होते. त्यांची समोरासमोर धडक होऊन ओम हा जागीच ठार झाला, तर संतोष आणि रोहन हे दोघे गंभीर जखमी झाले. या दोघांना छावणी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. (वार्ताहर)