शहरातून दोन मुलांचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:12 IST2021-01-02T04:12:13+5:302021-01-02T04:12:13+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहील घटना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पवननगर पसिरातील अपहृत मुलाच्या वडिलांनी अंबड पोलीस ठाण्यात ...

Two children abducted from the city | शहरातून दोन मुलांचे अपहरण

शहरातून दोन मुलांचे अपहरण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहील घटना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पवननगर पसिरातील अपहृत मुलाच्या वडिलांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा शुक्रवारी (दि. ३०) रोजी फिर्यादी यांचा मुलगा नेहमीप्रमाणे खेळण्यासाठी गेला असता, पुन्हा घरी परतला नाही, तसेच तो नातेवाइकांकडेही मिळून आला नाही, त्यामुळे अज्ञात व्यक्तीने त्याला फुस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करीत मुलाच्या वडिलांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दुसरी घटना म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, परिसरातील एका महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. या महिलेच्या अल्पवयीन मुलीस ३१ डिसेंबर रोजी अज्ञात व्यक्तीने फूस दाखवून पळवून नेले. या प्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Two children abducted from the city