शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सराईत गुन्हेगार व त्याच्या दोन साथीदारांकडून दोन गावठी कट्ट्यांसह काडतुसे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 01:07 IST

शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने सोमवारी (दि़३०) सापळा रचून सराईत गुन्हेगार व त्याच्या दोन साथीदारांकडून दोन गावठी कट्टे व दोन जिवंत काडतुसे जप्त केले़ सौरभ राजेंद्र ढगे (२२, रा. मामलेदार चौक, निफाड), आशिषकुमार श्रीपालकुमार श्रीपाल वर्मा व महंमद समीम महंमद इलीयास अशी अटक केलेल्या तिघा संशयितांची नावे आहेत. ढगे हा सराईत गुन्हेगार असून, आशिषकुमार आणि महंमद हे त्याचे परराज्यातील साथीदार हॉटेलमध्ये काम करीत होते़

नाशिक : शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने सोमवारी (दि़३०) सापळा रचून सराईत गुन्हेगार व त्याच्या दोन साथीदारांकडून दोन गावठी कट्टे व दोन जिवंत काडतुसे जप्त केले़ सौरभ राजेंद्र ढगे (२२, रा. मामलेदार चौक, निफाड), आशिषकुमार श्रीपालकुमार श्रीपाल वर्मा व महंमद समीम महंमद इलीयास अशी अटक केलेल्या तिघा संशयितांची नावे आहेत. ढगे हा सराईत गुन्हेगार असून, आशिषकुमार आणि महंमद हे त्याचे परराज्यातील साथीदार हॉटेलमध्ये काम करीत होते़  युनिट एकचे सहायक पोलीस उपनिरीक्षक जाकीर शेख व हवालदार बागुल यांना सराईत गुन्हेगार सौरभ ढगे हा त्र्यंबकरोडवर गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ व त्यांच्या पथकाने सोमवारी (दि.३०) सापळा रचून ढगे यास ताब्यात घेऊन दोन गावठी कट्टे आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केले. त्याची सखोल चौकशी केल्यानंतर साथीदार करण आप्पा कडूसकर याच्यासोबत काही दिवसांपूर्वी नाशिकरोड परिसरात घरफोडी केल्याचीही कबुली देत या घरातून गावठी कट्टा चोरल्याची कबुली दिली.  शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, नागेश मोहिते, दीपक गिरमे, सहायक पोलीस उपनिरीक्षक पोपट कारवाळ, हवालदार बाळासाहेब दोंदे, अनिल दिघोळे, वसंत पांडव, संजय मुळक यांच्या पथकाने ही कारवाई केली़घेतली घराची झडतीपोलिसांनी घरफोडी केलेल्या घराची पाहणी केली असता तेथील भाडेकरी आशिषकुमार वर्मा हे घर सोडून गेल्याचे समजले. मात्र नाशिकरोड येथील बास्को हॉटेलमध्ये काम करून राहत असल्याची माहिती मिळाली़ पोलिसांनी त्याची चौकशी केल्यानंतर त्याने हा गावठी कट्टा महंमद इलियास याने ठेवण्यासाठी दिल्याचे समोर आले़ पोलिसांनी इलियास याचा ताबा घेऊन घराची झडती घेतली असता एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी संशयित सौरभ ढगेविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा