वरवंडी पाझर तलावात दोन भावांचा बुडून मृत्यू

By Admin | Updated: February 11, 2017 00:48 IST2017-02-11T00:47:52+5:302017-02-11T00:48:46+5:30

वरवंडी पाझर तलावात दोन भावांचा बुडून मृत्यू

Two brothers drown in Varvandi Pazar lake | वरवंडी पाझर तलावात दोन भावांचा बुडून मृत्यू

वरवंडी पाझर तलावात दोन भावांचा बुडून मृत्यू

दिंडोरी : दिंडोरी तालुक्यातील वरवंडी येथे पाझर तलावात अंघोळीसाठी गेलेले दोन चुलत भाऊ असलेल्या शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला असून, यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की वरवंडी येथील सुनील राजाराम जाधव (१२) व रोशन संजय जाधव (११) हे चुलत भाऊ आंबेदिंडोरी येथे शिकत होते. आज माघी पौर्णिमेला वरवंडी येथे यात्रा असल्याने शाळेत न जाता ते घरी राहिले होते. दोघे बंधू सकाळी ११ च्या दरम्यान वस्तीवरील घरातून यात्रेत जायचे म्हणून गावात गेले; मात्र ते गावात जाण्याऐवजी महावीर पॉलिटेक्निक जवळ असलेल्या तलावात अंघोळीसाठी गेले व पोहता येत नसल्याने पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडून मरण पावले. सायंकाळी चार वाजेपर्यंत मुले घरी न आल्याने त्यांचा नातेवाइकांनी शोध घेतला मात्र ते सापडले नाही तलावाकडे शोध घेतला असताना त्यांचे कपडे तलावाच्या कडेला आढळल्याने पाण्यात शोध घेतला असता त्यांचा मृतदेह आढळला.
रोशन हा एकुलता एक मुलगा होता. या दुर्दैवी घटनेने जाधव कुटुंबीय व
संपूर्ण गावावर शोककळा पसरली. दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन रात्री अंत्यसंस्कार करण्यात
आला. दिंडोरी पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.

Web Title: Two brothers drown in Varvandi Pazar lake