शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेणाऱ्या दोघांची कारागृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 15:17 IST

नाशिक : जिल्ह्यातील शिक्षकांची माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक कर्मचारी सोसायटीत वेतन आयोगाचा फरक देण्याच्या मागणीसाठी लाच घेतल्या प्रकरणी ...

ठळक मुद्देसंचालक मंडळ बरखास्त करासंघटनांची मागणी

नाशिक : जिल्ह्यातील शिक्षकांची माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक कर्मचारी सोसायटीत वेतन आयोगाचा फरक देण्याच्या मागणीसाठी लाच घेतल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे. दरम्यान, बहुचर्चित एनडीएसटी सोसायटीतील या गैरप्रकारात संचालक मंडळाचा सहभागी असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करावी, अशी मागणी सोसायटीच्या सभासदांनी केली आहे.दोन दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने व्यवस्थापक जयप्रकाश कुंवर व शाखा व्यवस्थापक शरद जाधव या दोघांना १९ हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. या साºया प्रकरणाची सखोल चौकशी होण्यासाठी विद्यमान संचालक मंडळ तत्काळ बरखास्त करून प्रशासकांची नेमणूक करावी व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विविध संघटना पदाधिकाऱ्यांनी उपनिबंधकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यात म्हटले आहे की, लाचलुचपत विभागाने कारवाई करत दोन अधिकाºयांना अटक केली आहे. प्राथमिक अहवालात संचालक मंडळासाठी वेतन आयोग फरकाची रक्कम जमा करण्यात येत होती, असा जबाब आरोपींनी नोंदविल्याचे समजते. म्हणून संचालक मंडळाची भूमिका संशयास्पद ठरत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व संचालक मंडळाची मुदतवाढ तत्काळ रद्द करून प्रशासकांची नेमणूक करावी, अशी मागणी केली. यावेळी शिक्षक नेते प्रा. श्याम पाटील, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष के. के. अहिरे, साहेबराव कुटे, किरण पगार, राजेंद्र लोंढे, संग्राम करंजकर, संजय पाटील, बाळासाहेब सोनवणे, दत्ता वाघेपाटील, चंद्रशेखर शेलार, सुभाष भामरे आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :NashikनाशिकBribe Caseलाच प्रकरणjailतुरुंग