शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीतील रेव्ह पार्टीत दोन बॉलीवूड अभिनेत्रींचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 06:14 IST

बंगल्यात पोलिसांची कारवाई : हीना पांचालसह २२ जण ताब्यात

ठळक मुद्देयेथील दोन खासगी बंगल्यात शनिवारी मध्यरात्री ड्रग्ज, कोकेन, हुक्कासारख्या अमली पदार्थांची नशा करत बॉलिवूडमधील चार महिलांसह २२ उच्चभ्रू व्यक्तींचे ‘झिंग झिंग झिंगाट...’ सुरू होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन कोरिओग्राफर, तमीळ आणि काही हिंदी चित्रपटांत भूमिका साकारलेल्या  दोन   अभिनेत्री,  एका रिॲलिटी-शोमधील अभिनेत्रींसह १० पुरुष आणि १२ महिलांसह एकूण २२ व्यक्तींना नाशिक ग्रामीण पोलिसांनी इगतपुरीच्या दोन आलिशान बंगल्यात रेव्ह पार्टी करताना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. पोलिसांनी मुंबईतून एका नायजेरियन नागरिकालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

येथील दोन खासगी बंगल्यात शनिवारी मध्यरात्री ड्रग्ज, कोकेन, हुक्कासारख्या अमली पदार्थांची नशा करत बॉलिवूडमधील चार महिलांसह २२ उच्चभ्रू व्यक्तींचे ‘झिंग झिंग झिंगाट...’ सुरू होते. त्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने बंगल्यांवर पहाटे छापा टाकला. अमली पदार्थ बाळगणे व त्याचे सामूहिकपणे सेवन करणे आणि कोरोनाच्या नियमावलीचे उल्लंघन करत एकत्र येऊन गर्दी जमविल्याप्रकरणी विविध कलमान्वये संबंधितांविरुद्ध इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ताब्यात घेतलेल्यांमध्ये इराणची नागरिक असलेली एक महिला आहे.

पार्टीत हेही सामील

n पार्टीत बिग बॉसच्या सीझन-२ मधील प्रसिद्ध अभिनेत्री हीना पांचाल हिचाही सहभाग असल्याचे व्हायरल व्हिडिओतून दिसून आले. n दोन कोरिओग्राफर, एक विदेशी महिला तसेच पीयूष सेठिया, अमित लाट, आशिष लाट, रा. त्रिवेदी, विशाल मेहता, नीरज सुराणा, रोहित अराेरा, हर्ष शहा, दानिश खान, अबू बकर हनिफ शेख (सर्व, रा. मुंबई व पुणे) यांच्यासह १२ महिला असे २२ जण आढळले. n इगतपुरीतील हॉटेलसाठी ऑनलाइन बुकिंग होत असते आणि परिसरातील हॉटेल्स पार्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. यापूर्वीही इगतपुरी तालुक्यात पाकिस्तानी अभिनेत्री लैला खान हिचे प्रकरण खूप गाजले होते.

अमली पदार्थांचा पुरवठा मुंबईतून?पार्टी करण्यासाठी इगतपुरीत दाखल झालेल्या २२ जणांनी त्यांच्यासोबत अमली पदार्थांचा मोठा साठा मुंबईतून आणल्याचा पोलिसांना संशय आहे. हा पुरवठा कोठून आणि कोणी केला याच्या तपासासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांचे पथक तातडीने मुंबईत रवाना झाले आहे. मुंबईतून एका नायजेरियन नागरिकालाही ताब्यात घेऊन इगतपुरीत आणले आहे. 

वाढदिवसाच्या नावाखाली धिंगाणापीयूषच्या वाढदिवसानिमित्त दोन बंगल्यात हा सगळा धिंगाणा शनिवारी रात्री ८ वाजेनंतर सुरू झाला होता. १२ वाजता पीयूष सेठिया याने वाढदिवसाचा केक कापला आणि हिंदी-मराठी गीतांच्या चालीवर सर्व लोक थिरकत मद्यप्राशनासोबत हुक्का, चरस, गांजा, कोकेनसारख्या अमली पदार्थांच्या सेवनात दंग झाले. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून सर्वांना ताब्यात घेतले.

गोपनीय माहितीवरून शनिवारीमध्यरात्री आम्ही छापा मारला. अमली पदार्थाचा पुरवठा कोणी व कोठून केला? यांच्यासोबत अजून काही साथीदार होते का? आदींचा तपास केला जात आहे. एक पथक मुंबईला रवाना झाले आहे.     - सचिन पाटील,पोलीस अधीक्षक, नाशिक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbollywoodबॉलिवूडPoliceपोलिस