दोन दुचाकींचा अपघात
By Admin | Updated: November 10, 2015 22:38 IST2015-11-10T22:37:04+5:302015-11-10T22:38:05+5:30
अपघातात इसमाचा मृत्यू

दोन दुचाकींचा अपघात
: नाशिक : जेलरोडवरील सैलानीबाबा दर्ग्याजवळ दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़ मयत इसमाचे नाव सचिन वामन शिंदे (३८, रा़ जेलरोड, भगवा चौक, शिवाजीनगर) असे आहे़
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी (दि़ ८) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शिंदे हे दुचाकीवरून जात असताना समोरून आलेल्या दुचाकीने त्यांना धडक दिली़ यामध्ये त्यांच्या डोके व पोटास मार लागल्याने त्यांचे भाऊ मिलिंद शिंदे यांनी त्यांना प्रथम बिटको व नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात केले़
सोमवारी (दि़९) पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ या अपघाताची उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)