रेल्वे प्रवाशांचे मोबाइल चोरणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:11 IST2021-05-31T04:11:29+5:302021-05-31T04:11:29+5:30

शनिवारी (दि.२९) सकाळी नासिक रोडहून मुंबईकडे जाणारी हावडा एक्स्प्रेस इगतपुरी स्थानकात आली असता, सर्वसाधारण डब्यातील प्रवासी ...

Two arrested for stealing train passenger's mobile | रेल्वे प्रवाशांचे मोबाइल चोरणाऱ्या दोघांना अटक

रेल्वे प्रवाशांचे मोबाइल चोरणाऱ्या दोघांना अटक

शनिवारी (दि.२९) सकाळी नासिक रोडहून मुंबईकडे जाणारी हावडा एक्स्प्रेस इगतपुरी स्थानकात आली असता, सर्वसाधारण डब्यातील प्रवासी कुंदन चौधरी (रा.भोजपुर,बिहार) याने रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला कर्मचारी अमिषा पटेल यांना आपला मोबाइल चोरीस गेल्याचे सांगितले.

दरम्यान, त्यांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या इगतपुरी स्थानकावर कार्यरत असलेले कॉन्स्टेबल विजय माने व सबनीस कुमार यांना याविषयी माहिती दिली. त्यांनी तत्काळ डब्यातील प्रवाशांची चौकशी सुरू केली. यात विनोद विलास सावंत (वय ३२ रा.मुंबई) व अरुण वाहुले (वय ३९ रा.खडावली, मुंबई) हे दोन्ही संशयित आढळले. त्यांच्याकडे ५ हजार रुपये किमतीचा संगनमताने चोरी केलेला मोबाइल मिळून आला. या प्रकरणी इगतपुरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीस गेलेला मोबाइल तत्काळ मिळाल्याने फिर्यादी कुंदन चौधरी यांनी रेल्वे सुरक्षा दलाचे आभार मानले.

Web Title: Two arrested for stealing train passenger's mobile