देशी दारूची विक्री करणाऱ्या दोघांना अटक
By Admin | Updated: September 11, 2014 00:27 IST2014-09-10T22:34:37+5:302014-09-11T00:27:49+5:30
देशी दारूची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

देशी दारूची विक्री करणाऱ्या दोघांना अटक
ंमालेगाव : आंबेडकरपूल ते सरदार चौक रस्त्यावर विनापरवाना बेकायदेशीररित्या देशी दारूच्या बाटल्या कब्जात बाळगून विक्री करणाऱ्या महेबुब बेग बशीर बेग रा. महेबुबनगर ग. नं. १ व कल्लू अब्दूल खालीक (५४) रा. नजमाबाद या दोघांना पोलिसांनी अटक केली. शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी प्रसाद दराडे यांनी महेबुब बेगला ताब्यात घेवून त्याच्याकडून ७३७ रूपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. तर जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर मालकर यांनी आंबेडकरपुल ते सरदार चौक रस्त्यावरील टपरीच्या आडोश्याला कल्लू अब्दूल खालीक याला ताब्यात घेवून दोन हजार ५८० रूपयांच्या ८६ देशीदारूच्या बाटल्या जप्त केल्या. यातील मुख्य आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अधिक तपास जमादार आहेर करीत आहेत.