दरोड्याच्या तयारीतील दोघांना अटक; तीन फरार

By Admin | Updated: February 2, 2017 01:44 IST2017-02-02T01:43:40+5:302017-02-02T01:44:14+5:30

दरोड्याच्या तयारीतील दोघांना अटक; तीन फरार

Two arrested for preparing for dacoity; Three absconding | दरोड्याच्या तयारीतील दोघांना अटक; तीन फरार

दरोड्याच्या तयारीतील दोघांना अटक; तीन फरार

 नाशिक : अशोकस्तंभ परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाचपैकी दोघा संशयितांना सरकारवाडा पोलिसांनी मंगळवारी (दि़३१) मध्यरात्री अटक केली आहे तर फरार झालेल्या उर्वरित तिघांचा शोध सुरू असून त्यांच्यावर दरोड्याच्या पूर्वतयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
याबाबत अधिक माहिती अशी की, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी रात्रीच्या सुमारास गस्त घालत होते़ त्यांना अशोकस्तंभाजवळील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ पाच जणांचे टोळके संशयास्पदरीत्या उभे होते़ पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यातील तिघे फरार झाले तर उर्र्वरित राजू अहिरे (२१, रा़ मल्हारखाण झोपडपट्टी, गंगापूररोड) व रोशन बरू (२३, रा़ मल्हारखाण झोपडपट्टी, गंगापूररोड) या दोघांना ताब्यात घेतले़
पोलिसांनी अहिरे व बरू यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे नायलॉनची दोरी, कोयता, मिरचीची पूड असे दरोडा टाकण्याचे साहित्य आढळून आले़ तर उर्वरित साथीदारांची चौकशी केली असता त्यांनी किशोर बरू, रिकी धोंड व राजेश अहिरे ही नावे पोलिसांना सांगितली़ याप्रकरणी राजेंद्र शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या पाचही संशयितांविरोधात सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Two arrested for preparing for dacoity; Three absconding