नाशिक : नांदगाव-मालेगाव रस्त्यावरील मेहुणे शिवारात ट्रक अडवून लुटमार करणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील दोघा संशयिताना नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे़ कलीम शब्बीर शहा ( रा. नारेगाव, जि. औरंगाबाद) व शेख अरबाज शेख नब्बु (रा. सहारा पॉइंट, औरंगाबाद) अशी त्यांची नावे असून, त्यांनी गुन्ह्यात वापरलेली रिक्षा (एमएच २० बीटी ९३४२) व लुटमार केलेली रक्कम असा एक लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयिताना न्यायालयाने १८ जूनपर्यंत कोठडी सुनावली आहे़ गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे व त्यांचे पथक महामार्गासह मालेगाव परिसरातील रस्त्यावर संशयितांचा माग काढत असताना, दरोडा टाकणारे व गुन्ह्णातील रिक्षा औरंगाबादची असल्याचे समोर आले. त्यानुसार गेल्या चार-पाच दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक औरंगाबादमध्ये तळ ठोकून असताना औरंगाबादच्या नारेगाव परिसरातून कलीम शहा व शेख अरबाज शेख नब्बु यांना सापळा रचून अटक केली. या दोघांनी एका अल्पवयीन संशयिताच्या मदतीने ट्रक लुटला होता. मालेगावमध्ये नातलगांकडे आले असता, औरंगाबादला जात असताना त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. सहायक निरीक्षक आशिष अडसुळ, संदीप दुनगहू, उपनिरीक्षक स्वप्निल नाईक, सुनील आहिरे, वसंत महाले, दीपक आहिरे, राजू मोरे, सुहास छत्रे, पुंडलिक राऊत, राकेश उबाळे, अमोल घुगे, रतिलाल वाघ, फिरोज पठाण, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, राजू वायकंडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली़ नांदगाव-मालेगाव रस्त्यावरील मेहुणे शिवारात ट्रक अडवून लुटमार करणाºया औरंगाबाद जिल्ह्णातील दोघा संशयितांना अटक करणाºया ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासमवेत ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे़ २९ मे २०१८ रोजी मध्यरात्री कल्याण बडोगे हा ट्रकचालक (एमएच १६ एई १८५२) औरंगाबाद येथून तांदूळ घेऊन मालेगाव येथे जात होता़ मेहुणे शिवारात रिक्षातून आलेल्या चार-पाच संशयितांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने ट्रकचालकाच्या कॅबिनमध्ये घुसून चालक व क्लीनरला चाकूचा धाक दाखविला़ यानंतर रोख रक्कम व मोबाइल फोन असा १९ हजार ७०० रुपयांची रोकड लुटून नेली होती़
मेहुणे दरोड्यातील दोघांना औरंगाबाद येथून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 01:44 IST