बॅटऱ्या चोरीप्रकरणी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 01:29 AM2021-04-23T01:29:27+5:302021-04-23T01:29:52+5:30

मालेगाव येथील महानगरपालिकेच्या काल बुधवारी चोरीस गेलेल्या बॅटऱ्या शोधण्यात किल्ला पोलिसांना यश आले असून पोलिसानी मुद्देमालासह संशयितांना अटक केली आहे.  

Two arrested for battery theft | बॅटऱ्या चोरीप्रकरणी दोघांना अटक

बॅटऱ्या चोरीप्रकरणी दोघांना अटक

Next

मालेगाव : येथील महानगरपालिकेच्या काल बुधवारी चोरीस गेलेल्या बॅटऱ्या शोधण्यात किल्ला पोलिसांना यश आले असून पोलिसानी मुद्देमालासह संशयितांना अटक केली आहे.  
बुधवारी (दि.२१) महानगरपालिकेच्या आवारासह वाडिया रुग्णालयातून सुमारे ४१ घंटागाड्यांतील बॅटऱ्या चोरीस गेल्या होत्या. पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपी इम्तियाज मोईद्दीन शाह (रा. किल्ला झोपडपट्टी, अल्लमा इकबाल पुलाजवळ)  आणि हरीश ऊर्फ अभय शंभू गुप्ता  यांना अटक करून  तसेच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. बॅटरी  विकत घेणारे एफ.एम. बॅटरी दुकानाचे मालक  फरहान अहमद इकबाल अहमद यांच्या ताब्यातून बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या 
आहेत. 

Web Title: Two arrested for battery theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.