शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
2
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
3
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
4
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
5
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
6
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
7
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
8
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
9
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
10
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
11
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
12
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
13
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
14
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
15
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
16
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
17
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
18
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
19
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
20
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय

अडीच तास बिबट्याचे थरारनाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 12:53 AM

वेळ सकाळी साडेसात वाजेची... ठिकाण सावरकरनगर गंगापूर पोलीस ठाणे... सकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या जॉगर्सला बिबट्याचे दर्शन होते. परिसरात बिबट्या आल्याची वार्ता कर्णोपकर्णी पसरली अन् वनविभागाचे रेस्क्यू पथक पोहचण्यापूर्वीच शेकडोंच्या संख्येने बघ्यांनी गर्दी केली.

नाशिक : वेळ सकाळी साडेसात वाजेची... ठिकाण सावरकरनगर गंगापूर पोलीस ठाणे... सकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या जॉगर्सला बिबट्याचे दर्शन होते. परिसरात बिबट्या आल्याची वार्ता कर्णोपकर्णी पसरली अन् वनविभागाचे रेस्क्यू पथक पोहचण्यापूर्वीच शेकडोंच्या संख्येने बघ्यांनी गर्दी केली. परिणामी बिबट्या अधिकच आक्रमक झाला आणि चवताळलेल्या बिबट्याने सुरक्षित ठिकाणी धाव घेताना चार लोकांवर झडप घातली. एक वनरक्षक, नगरसेवकासह दोघे पत्रकार या हल्ल्यात जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२५) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर चवताळलेला बिबट्या वनविभाग कर्मचाऱ्यांच्या जाळ्यात अडकला अन् रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.डाव्या कालव्याच्या परिसरापासून तर थेट गंगापूर पंपिग स्टेशनपर्यंत बिबट्याचा मागील पंधरवड्यापासून संचार सुरू होता. मखमलाबाद-हनुमानवाडी लिंकरस्त्यावर संध्याकाळी तसेच रात्रीदेखील बिबट्याने काहींना दर्शन दिले होते; मात्र शुक्रवारी मध्यरात्रीनंतर बिबट्या थेट गंगापूर पोलीस ठाण्याच्या परिसरातील सावरकरनगरात दाखल झाला. येथील पामस्प्रिंग कॉलनीच्या उद्यानापासून पुढे गंगापूर पोलीस ठाण्याकडे जाणाºया रस्त्यावर बिबट्याने धाव घेत येथील एका मोकळ्या भूखंडावर वाढलेल्या गाजरगवताच्या झाडीझुडपात आश्रय घेतला. बघ्यांची गर्दी अधिक असल्यामुळे काहींच्या हातात काठ्या होत्या व आरडाओरड अन् गोंधळ सुरू झाल्यामुळे बिबट्याने ही जागा सोडत थेट सपट व्हिलाच्या गल्लीत झेप घेत दीपज्योती बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या भूखंडावरील गवताच्या आडोशाला आश्रय घेतला. या खासगी भूखंडाच्या चौहोबाजूने बंगले, सोसायट्या आहेत त्यामुळे वनविभागाचे रेस्क्यू पथकाचे वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार व त्यांच्या चमूला बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शन सोडणे कठीण झाले. बंगल्याच्या छतावर जाऊन तेथून प्रयत्न करण्यात आला; मात्र तोपर्यंत बिबट्याने भूखंडावरून धूम ठोकत मारवा हाउस नावाच्या बंगल्यात प्रवेश केला. यावेळी बिबट्याची डरकाळी ऐकून पुन्हा एकच कल्लोळ केल्याने बिबट्या पुन्हा बंगल्यातून बाहेर पडला आणि नगरसेवक संतोष गायकवाड यांनी काठी घेऊन बिबट्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला.मुनगंटीवार यांच्याकडून जखमींची विचारपूससोलापूर दौºयावर असलेले वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांच्याशी संपर्क करत घटनेची माहिती घेतली. तसेच जखमींच्या नातेवाइकांशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला.

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिक