कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या तुलनेत बाधित दुप्पट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:11 IST2021-06-28T04:11:57+5:302021-06-28T04:11:57+5:30

नाशिक : जिल्ह्यात रविवारी (दि. २७) एकूण १२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यातुलनेत बाधितांची संख्या जवळपास दुप्पट म्हणजे २०६ ...

Twice as affected as those who are coronary free! | कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या तुलनेत बाधित दुप्पट !

कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या तुलनेत बाधित दुप्पट !

नाशिक : जिल्ह्यात रविवारी (दि. २७) एकूण १२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यातुलनेत बाधितांची संख्या जवळपास दुप्पट म्हणजे २०६ आहे. दरम्यान, पोर्टलवर बळी अपडेट करण्याचे काम सुरूच असून, ५४ बळींची त्यावर नोंद करण्यात आल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८३३३ वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात पोर्टलवर अपडेट करण्यात आलेल्या बळींमध्ये ३५ नाशिक मनपा क्षेत्रातील, ग्रामीणचे १८ तर मालेगाव मनपा क्षेत्रातील एका बळीचा समावेश आहे. दरम्यान, काल वाढ झालेल्या बाधितांमध्ये ११२ नाशिक ग्रामीणचे, ८५ नाशिक मनपाचे, ६ जिल्हाबाह्य तर ३ मालेगाव मनपा क्षेत्रातील आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील उपचारार्थी रुग्णसंख्येत पुन्हा काहीशी वाढ होऊन ती अडीच हजारांवर जाऊन २५२१ झाली आहे, तर जिल्ह्यातील कोरोनामुक्तीचा दर ९७.२५ वर आला आहे.

Web Title: Twice as affected as those who are coronary free!