प्रभाग १७ साठी बारा, तर ६१ साठी चौदा अर्ज

By Admin | Updated: June 11, 2014 01:07 IST2014-06-11T00:52:05+5:302014-06-11T01:07:32+5:30

प्रभाग क्रमांक १७ मधील काँग्रेसचे नगरसेवक दिनकर पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत बसपाकडून उमेदवारी केल्याने त्यांना नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे.

Twenty-six for ward 17, and fourteen forms for 61 | प्रभाग १७ साठी बारा, तर ६१ साठी चौदा अर्ज

प्रभाग १७ साठी बारा, तर ६१ साठी चौदा अर्ज

 

सातपूर : येथील प्रभाग क्रमांक १७ मधील पोटनिवडणुकीत आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीकडून माजी नगरसेवक दिनकर पाटील (भाजपा), तर आघाडीकडून माजी नगरसेवक सदाशिव माळी (काँग्रेस) यांच्यासह तिघा अपक्ष उमेदवारांनी १२ अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले.
प्रभाग क्रमांक १७ मधील काँग्रेसचे नगरसेवक दिनकर पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत बसपाकडून उमेदवारी केल्याने त्यांना नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. दिनकर पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्याने भाजपाने त्यांना या पोटनिवडणुकीत उमेदवारी बहाल केली आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी दिनकर पाटील यांच्यासमवेत भाजपाचे शहर अध्यक्ष लक्ष्मण सावजी, उपमहापौर सतीश कुलकर्णी, विजय साने, गोपाळ पाटील, सुरेश पाटील, प्रा. देवयानी फरांदे, नाना शिलेदार, जगन पाटील, सातपूर मंडल अध्यक्ष संजय राऊत, शिक्षण मंडळ सदस्य रामहरी संभेराव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेऊन राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सदाशिव माळी यांनी आपला अर्ज दाखल केला.
यावेळी नाना महाले, अश्विनी बोरस्ते, शोभा बच्छाव, योगिता अहेर, कविता कर्डक, शमीना मेमन, हेमलता पाटील, शोभा मगर, लक्ष्मण जायभावे, बाळासाहेब जाधव, भिवानंद काळे आदिंसह आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे साहेबराव जाधव, कोळप्पा धोत्रे, सुनील शेंद्रे या उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. (वार्ताहर)

Web Title: Twenty-six for ward 17, and fourteen forms for 61

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.