वैद्यनगरमध्ये चोवीस तोळे सोन्याचे दागिने लंपास

By Admin | Updated: April 20, 2017 18:08 IST2017-04-20T18:08:45+5:302017-04-20T18:08:45+5:30

वैद्यनगरमध्ये चोवीस तोळे सोन्याचे दागिने लंपास

Twenty-four tola gold jewelry lamps in Vaidyanagar | वैद्यनगरमध्ये चोवीस तोळे सोन्याचे दागिने लंपास

वैद्यनगरमध्ये चोवीस तोळे सोन्याचे दागिने लंपास

नाशिक : बंद घराची कडी उघडून चोरट्यांनी दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि़ १९) दुपारच्या सुमारास जनरल वैद्यनगरमध्ये घडली़
गोकुळ बंगल्यासमोरील कौशल्य नंदन अपार्टमेंटमधील स्मिता सोपान भांगरे यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दुपारी अडीच ते सात वाजेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या बंद घराची कडी उघडून घरात प्रवेश केला़ यानंतर घरातील १ लाख ५९ हजार रुपये किमतीचे १६ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले़ त्यामध्ये सोन्याचे गंठण, नेकलेस, वेढा, अंगठी व कानातले या दागिन्यांचा समावेश आहे़
या प्रकरणी भांगरे यांच्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़(प्रतिनिधी)

Web Title: Twenty-four tola gold jewelry lamps in Vaidyanagar