जिल्ह्यातील दहा ‘निर्भयांना’ २४ लाखांची मदत

By Admin | Updated: July 11, 2014 00:33 IST2014-07-10T23:46:00+5:302014-07-11T00:33:38+5:30

जिल्ह्यातील दहा ‘निर्भयांना’ २४ लाखांची मदत

Twenty-four 'Nirbhaya' support of 24 lacs in the district | जिल्ह्यातील दहा ‘निर्भयांना’ २४ लाखांची मदत

जिल्ह्यातील दहा ‘निर्भयांना’ २४ लाखांची मदत

नाशिक : अन्याय व अत्याचार झालेल्या महिला व मुलींना
देण्यात येणाऱ्या राज्य सरकारच्या निर्भया योजनेअंतर्गत जिल्ह्यातील
१३ पैकी दहा अत्याचारपीडित निर्भयांचे (महिला/मुलींचे) प्रस्ताव मंजूर करण्यात येऊन त्यांना २४ लाखांची मदत प्रदान करण्यात
आली.
निर्भया योजनेसंदर्भात आलेल्या प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत प्राप्त १३ प्रस्तावांवर चर्चा होऊन दहा प्रस्ताव मंजूर करण्यात आले, तर एक प्रस्ताव नामंजूर करण्यात येऊन दोन प्रस्ताव प्रलंबित राहिले.
मंजूर दहा प्रस्तावांपैकी अत्याचारपीडित सहा महिला/मुलींना प्रत्येकी तीन लाख, एका महिलेला दोन लाख, तर दोघींना प्रत्येकी एक लाखाची मदत मंजूर करण्यात आली. या सर्व महिलांना धनादेश प्रदान करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Twenty-four 'Nirbhaya' support of 24 lacs in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.