शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममधून पंचवीस हजारांची रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:51 IST

एटीएममधून पैसे न आल्याने गुगल मॅपवरून बँकेच्या आयकॉनवर असलेल्या नंबरवर चौकशी केली असता संबंधित संशयिताने एटीएम कार्डचा नंबर व आयडी मागून खात्यातून परस्पर २५ हजार रुपये काढून घेतल्याची घटना अशोकस्तंभ परिसरात घडली़

नाशिक : एटीएममधून पैसे न आल्याने गुगल मॅपवरून बँकेच्या आयकॉनवर असलेल्या नंबरवर चौकशी केली असता संबंधित संशयिताने एटीएम कार्डचा नंबर व आयडी मागून खात्यातून परस्पर २५ हजार रुपये काढून घेतल्याची घटना अशोकस्तंभ परिसरात घडली़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशोकनगर येथील कल्पतरूनगरमध्ये दीपक दत्तात्रय निकम (४६, साईस्मित रो-हाउस) राहतात. मंगळवारी (दि. २५) दुपारी ते अशोकस्तंभावरील सिंडीकेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते; मात्र येथील एटीएम मशीनमधून पैसे न आल्याने त्यांनी गोळे कॉलनीतील एलआयसी आॅफिस परिसरात गेल्यावर गुगल मॅपच्या सहाय्याने सिंडीकेट बँकेच्या आयकॉनवर असलेल्या ९७४८३२८०५२ या मोबाइल क्रमांकावर चौकशी करण्यासाठी फोन केला़ यावेळी समोरून संशयिताने निकम यांच्या एटीएम कार्डचा नंबर व बॅच आयडी मागितला़ यानंतर संशयिताने निकम यांच्या अशोकामार्ग येथील सिंडीकेट बँकेच्या खात्यातून पंचवीस हजार रुपये परस्पर काढून घेतले़ या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी अज्ञात संशयिताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी