बारावीच्या ८६ टक्के उत्तरपत्रिका जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 10:47 PM2020-03-31T22:47:38+5:302020-03-31T22:48:43+5:30

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीचे परीक्षा पेपर पूर्ण झाले असून, ८६ टक्के उत्तरपत्रिका तपासण्याचे कामही पूर्ण झाले आहे. परंतु दहावीच्या विद्यार्थ्यांना अखेरचा पेपर देता आलेला नसल्यामुळे दहावीचा निकाल लांबण्याची चिन्हे आहेत.

Twenty-eight percent answer sheets | बारावीच्या ८६ टक्के उत्तरपत्रिका जमा

बारावीच्या ८६ टक्के उत्तरपत्रिका जमा

googlenewsNext
ठळक मुद्देदहावीचा निकाल लांबण्याची चिन्हे आहेत.

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीचे परीक्षा पेपर पूर्ण झाले असून, ८६ टक्के उत्तरपत्रिका तपासण्याचे कामही पूर्ण झाले आहे. परंतु दहावीच्या विद्यार्थ्यांना अखेरचा पेपर देता आलेला नसल्यामुळे दहावीचा निकाल लांबण्याची चिन्हे आहेत.
नाशिक विभागात बारावीच्या परीक्षेला यंदा १ लाख ६६ हजार ४६८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. दहावीच्या परीक्षेला नाशिकमधून ९७ हजार ९१२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यापैकी बारावीच्या ८६ टक्के विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासून त्यांचे सबमिशन पूर्ण झाले आहे.
तर उर्वरित उत्तरपत्रिका सबमिशनचे काम ५ एप्रिलला सुरू करून ७ ते ८ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे मंडळाचे विभागीय सचिव नितीन उपासनी यांनी सांगितले. नाशिक विभागात सर्वाधिक उत्तरपत्रिकांच्या सबमिशनचे काम पूर्ण झाले असून, राज्यातील नऊ विभागांमध्ये नाशिक आघाडीवर आहे. तर दहावीच्या उत्तरपत्रिका सबमिशन १४ एप्रिलपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आले असून, त्याविषयी १४ एप्रिलनंतरच प्रक्रिया सुरू होईल.

Web Title: Twenty-eight percent answer sheets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.