सिन्नर येथे बारा वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:30 IST2020-12-12T04:30:58+5:302020-12-12T04:30:58+5:30

प्रज्योत सुभाष जाधव (१२) असे या मुलाचे नाव आहे. एमआयडीसी येथे कारखान्यात नोकरी करणाऱ्या सुभाष नानाजी जाधव यांचा तो ...

Twelve-year-old boy commits suicide by hanging at Sinnar | सिन्नर येथे बारा वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

सिन्नर येथे बारा वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

प्रज्योत सुभाष जाधव (१२) असे या मुलाचे नाव आहे. एमआयडीसी येथे कारखान्यात नोकरी करणाऱ्या सुभाष नानाजी जाधव यांचा तो मुलगा आहे. प्रज्योत सायंकाळी घरातील वरच्या खोलीत ऑनलाइन अभ्यास करीत होता, तर त्याची आई आणि मोठा भाऊ शेजारच्या खोलीत होते. आई काही वेळाने प्रज्योतला बोलाविण्यासाठी गेली, मात्र आतून दार लावलेले होते. मुलगा झोपला असेल म्हणून आई पुन्हा एक तासाने बोलवायला गेली. आवाज देऊनही दार उघडत नसल्याने शेजारच्यांना आवाज दिला. खिडकीतून पाहिल्यानंतर प्रज्योत खाली पडलेला दिसला. दार तोडून आत प्रवेश करून प्रज्योतला रुग्णालयात नेले. मात्र तत्पूर्वी तो मयत झाला होता. वायरच्या साहाय्याने त्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. शेजारी राहणारे राजेंद्र देशमुख यांनी याप्रकरणी माहिती दिली. त्यानंतर सिन्नर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राहुल निरगुडे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Twelve-year-old boy commits suicide by hanging at Sinnar