नाशिक : महापालिका क्षेत्रातील अकरावी प्रवेशासाठी नाशिक जिल्ह्यातील विविध भागातून सोमवारी सायंकाळपर्यंत जवळपास बारा हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. शहरातील सुमारे ६० कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली असून या ६० महाविद्यालयांध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी २५ हजार २७० जागावंर प्रवेशासाठी रविवार (दि.२६) पासून ऑनलाईन नोंदणीला सुरूवात झाली आहे.महाराष्ट्रात नाशिकसह मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी-चिचवड, औरंगाबाद, अमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रांत अकरावीच्या प्रवेशासाठी रविवारपासून कें द्रीभूत ऑनलाइन प्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेत नाशिकमध्ये पहिल्याच दिवशी ७ हजार ५६ विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यात दुसऱ्या दिवशी सुमारे ४ हजार ९२४ विद्यार्थ्यांची भर पडली असून सोमवारी (दि.२७) सायंकाळपर्यंत ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ११ हजार ९८० पर्यंत पोहचली होती. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयाकडून अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल केले असून, शुक्रवारी (दि.२४) सुधारित वेळापत्रक जाहीर केल्यानंतर रविवारपासून विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन नोंदणीस सुरुवात झाली आहे. याप्रक्रि येच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लॉगीन आयडी मिळविणे व पासवर्ड प्राप्त होणार असून, त्याआधारे एक ऑगस्टपासून प्रवेशप्रक्रियेच्या संकेतस्थळावर जाऊन मिळालेल्या अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जाचा भाग-एक भरण्याची प्रक्रिया करता येणार आहे. या अर्जातील माहिती शाळा अथवा मार्गदर्शन केंद्रावरून प्रमाणित करून घेत संकेतस्थळावर अर्ज सादर करणे आवश्यक आहे, तर दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग-२ भरण्याबाबतच्या प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.
नाशकात अकरावी प्रवेशासाठी बारा हजार विद्यार्थ्यांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 18:11 IST
अकरावी प्रवेशासाठी नाशिक जिल्ह्यातील विविध भागातून सोमवारी सायंकाळपर्यंत जवळपास बारा हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. शहरातील सुमारे ६० कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली असून या ६० महाविद्यालयांध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी २५ हजार २७० जागावंर प्रवेशासाठी रविवार (दि.२६) पासून ऑनलाईन नोंदणीला सुरूवात झाली आहे.
नाशकात अकरावी प्रवेशासाठी बारा हजार विद्यार्थ्यांची नोंदणी
ठळक मुद्देअकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू नाशिक महापालिका क्षेत्रात बारा हजार विद्यार्थ्यांची नोंदणी