बारा हजार उमेदवारांनी दिली तलाठी परीक्षा
By Admin | Updated: October 4, 2015 23:50 IST2015-10-04T23:50:15+5:302015-10-04T23:50:48+5:30
बारा हजार उमेदवारांनी दिली तलाठी परीक्षा

बारा हजार उमेदवारांनी दिली तलाठी परीक्षा
नाशिक : जिल्हा प्रशासनात भरण्यात येणाऱ्या तलाठी व लिपिक पदांसाठी परीक्षा घेण्यात आली असून, यामध्ये तलाठी पदासाठी ११ हजार ८२७ उमेदवार, लिपिक पदासाठी दोन हजार ७४५ उमेदवार, तर स्टाफ सिलेक्शन पदासाठी आठ हजार ५९ उमेदवार उपस्थित होते.
दोन सत्रांत शहरातील विविध ७५ केंद्रांवर घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तथा तयारी केली होती. तलाठी पदासाठी एकूण पंधरा हजार ३६८ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यातील ११ हजार ८२७ उमेदवार उपस्थित होते, तर तीन हजार ५४१ उमेदवार गैरहजर होते. लिपिक-टंकलेखक पदासाठी पाच हजार ३१४ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यातील दोन हजार ७४५ उमेदवारांनी परीक्षा दिली. स्टाफ सिलेक्शन पदासाठी आठ हजार २०८ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यातील आठ हजार ५९ उमेदवार परीक्षेसाठी उपस्थित होते, तर १४९ उमेदवार गैरहजर होते. प्रशासनाकडून आठशे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष नियोजनात सहभाग घेतला होता. याकरिता ५० वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. (प्रतिनिधी)