देवळ्यातील ऊस उत्पादक अडचणीत
By Admin | Updated: March 22, 2015 00:47 IST2015-03-22T00:46:53+5:302015-03-22T00:47:04+5:30
देवळ्यातील ऊस उत्पादक अडचणीत

देवळ्यातील ऊस उत्पादक अडचणीत
पाळे खुर्द : दोन वर्षापासून वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याची चाके न फिरल्याने कळवण तालुक्यातील विशेषत: पश्चिम पट्ट्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून, मार्च महिना संपत आला तरी पश्चिम पट्ट्यातील शेतकऱ्याची ऊसतोड झालेली नाही.
तालुक्यातील द्वारकाधीश साखर कारखाना सुरू असून कळवण तालुक्यातील उसाचे गाळप याच कारखान्याच्या माध्यमातून सुरू आहे. सदर कारखान्याची गाळप क्षमता कमी आहे. पश्चिम पट्ट्यात उसाचे आहे. त्यामुळे गाळप करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाना तोंड द्यावे लागत आहे. उन्हाळा सुरू झाल्याने उसाच्या वजनात घट येण्याची शक्यता आहे. तुटलेला ऊस लगेचच गाळपाला गेला तर कमी प्रमाणात घट येते. परंतु उसाची वाहतूक करण्यास विलंब होत असल्याने उसाच्या वजनात घट
होते. त्याच बरोबर गुरासाठी मिळणारी हिरवी बांडी सुकली जाऊन तिचे पाचत यामुळे गुरांना खान्यासाठी हिरवी बांडी मिळत नाही.
त्याचबरोबर उन्हाचा तडाखा व तिरीप वाढल्याने ऊसतोड कामगाराच्या क्रयशक्तीवर विपरीत परिणाम होऊन सरासरी दोन ते तीन दिवसांनी साधारणत: एक ट्रक भरेल इतकी ऊसतोड करून कारखान्याकडे रवाना होतो. त्यामुळे ऊसतोड कार्यक्रम संथ गतीने सुरू असून, त्याचा परिणाम हा शेतकरी जनजीवनावर होत आहे. (वार्ताहर)