कांदा उत्पादक अडचणीत
By Admin | Updated: July 23, 2016 00:37 IST2016-07-23T00:30:14+5:302016-07-23T00:37:26+5:30
लासलगाव : पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील लिलाव बंद

कांदा उत्पादक अडचणीत
लासलगाव : जिल्ह्यातील सर्व बाजार समितीच्या आवारातील व्यापाऱ्यांनी आपले परवाने परत केले असले तरी, संचालक असणाऱ्या व्यापाऱ्यांनी मात्र परवाने जमा न करता आंदोलनाचा फार्स केला की काय याची चर्चा सुरू आहे.
नवीन व्यापारीवर्गाच्या वतीने लासलगाव बाजार समितीत परवाने घेण्याबाबत चौकशी वाढली आहे. पुणे, मुंबई, धुळे, अहमदनगर तसेच नवी मुंबई येथील मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांनी परवाने घेणेबाबत चौकशी केली आहे. व्यापारी संघटनेचे बहुतांशी नेते बाजार समितीच्या संचालक मंडळावर आहेत. इतर व्यापारीवर्गाने परवाने परत केले; परंतु दुटप्पीपणा ठेवीत संचालक पद रद्द होण्याची शक्यता लक्षात घेऊन या नेत्यांनी परवाने परतच केलेले नाहीत, अशी खात्रीलायक माहिती आहे.
लिलाव बंदने केवळ शेतकरी व व्यापारी नव्हे तर हमाल, मापारी, ट्रकमालक, चालक, व्यावसायिकांची दुकाने बंद आहेत.
राज्य सरकारने सक्षम पर्याय निर्माण करूनच असे निर्णय घेतले पाहिजेत, असे शेतकरी बोलताना दिसून आले.
सध्या शेतकऱ्यांकडे उन्हाळी कांद्याची चांगली आवक असून, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बी-बियाणेंसाठी शेतकरी कांदा विक्रीसाठी उत्सुक आहेत. त्यातही जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी पावसाची रिमझिम सुरू असल्याने पावसाची आर्द्रता लागून कांद्यांना कोंब फुटण्याची शक्यता आहे. अशावेळी बहुतांशी शेतकर्?यांना कांदा साठवून ठेवणे अडचणीचे ठरत आहे. नेमकी हीच परिस्थिती अधिक तीव्र करून शेतकर्?यांचा माल कवडीमोल भावाने खरेदी करण्याचा व्यापार्?यांचा डाव असल्याची शंका शेतकरी, जाणकारांकडून व्यक्त होत आहे. मुळात राज्यभरातील व्यापार्?यांनी ज्या मागण्यांसाठी बंद केला होता त्याबाबत शासन स्तरावर चर्चा होऊन बंद मागे घेण्यात आल्यानंतरही जिल्ह्यातील व्यापार्?यांनी बंद सुरूच ठेवल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.