निर्यात अनुदान बंद केल्याने कांदा दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 03:04 PM2019-06-15T15:04:33+5:302019-06-15T15:04:51+5:30

सिन्नर : कांदा निर्यातीवरील १० टक्के अनुदान केंद्र शासनाने बंद केल्यानंतर पहिल्याच दिवशी त्याचा परिणाम बुधवारी सिन्नर कृषी उत्पन्न बाजारात दिसून आला.

Turning off export subsidy onion rates fall | निर्यात अनुदान बंद केल्याने कांदा दरात घसरण

निर्यात अनुदान बंद केल्याने कांदा दरात घसरण

Next

सिन्नर : कांदा निर्यातीवरील १० टक्के अनुदान केंद्र शासनाने बंद केल्यानंतर पहिल्याच दिवशी त्याचा परिणाम बुधवारी सिन्नर कृषी उत्पन्न बाजारात दिसून आला. येथे सरासरी १०० रूपये क्विंटल दराने कांद्याच्या भावात घसरण झाल्याने शेतकऱ्यांत काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले. गेल्या वर्षभरात कांद्याच्या घसरत्या दराने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले होते. मात्र, गेल्या महिनाभरात दरात सुधारणा झाल्याने शेतक-यांत समाधानाचे वातावरण होते. कांद्याचे दर सुधारत असतानाच भविष्यात खूप दरवाढ होऊ नये यासाठी केंद्र शासनाने कांदा निर्यात अनुदान बंद केल्याची बातमी धडकताच त्याचे दृश्य परिणाम बाजार समित्यांमध्ये दिसायला सुरूवात झाली आहे. दरातील या घसरणीने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (दि. १०) ७ हजार ६८ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. या दिवशी जास्तीत जास्त १४९० रूपये तर सरासरी १३७५ रूपये क्विंटल दराने व्यापाºयांनी कांद्याची खरेदी केली. मंगळवारी १९७५ क्विंटल आवक झाली होती. जास्तीत जास्त १३७५ तर सरासरी १२७५ रूपये दर कांद्यास मिळाला. बुधवारी सरासरी दरात आणखी १०० रूपयांची घसरण झाल्याचे दिसले. अवघी १७२० क्विंटल कांद्याची आवक होऊनही जास्तीत जास्त १३१५ रूपये तर सरासरी ११७५ रूपये दराने कांदा विकला गेला. सध्या खरीप हंगाम उभा करण्यासाठी शेतकरी कांदे बाजारात आणून पैसे मोकळे करत आहेत. मात्र, दरात घसरण झाल्याने त्यांना कमी दरात कांद्याची विक्री करणे भाग पडणार आहे. परिणामी ढासळत्या दरामुळे आर्थिक फटका सोसावा लागणार आहे. शेतकरी हिताचे निर्णय घेण्याच्या वल्गना करणा-या युती शासनाने लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर लगेचच कांद्याच्या निर्यातीवरील अनुदान बंद केल्याने शेतक-यांत हा चर्चेचा विषय ठरला आहे.

Web Title: Turning off export subsidy onion rates fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक