वीज उपकेंद्र पाडले बंद

By Admin | Updated: September 13, 2016 01:03 IST2016-09-13T01:02:44+5:302016-09-13T01:03:00+5:30

विखरणी : ‘अक्षयप्रकाश’ पूर्ण न केल्याने शेतकरी संतप्त

Turn off the power sub-station | वीज उपकेंद्र पाडले बंद

वीज उपकेंद्र पाडले बंद

पाटोदा : विखरणीसह परिसरातील कातरणी आडगाव रेपाळ, कानडी व अन्य गावांना सुरळीत वीजपुरवठा व्हावा. यासाठी आमदार छगन भुजबळ यांनी सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून उभे केलेले सबस्टेशन अनेक त्रुटी असतानाच व लाभक्षेत्रातील गावासाठी मंजूर असलेली अक्षयप्रकाश योजना सुरू न करताच आज (दि.१२) सायंकाळी ६ वाजता वीज वितरण कंपनीचे अधिकारी मुनकर, सूर्यवंशी व आॅपरेटर कुऱ्हाडे यांनी विखरणी येथील सबस्टेशन सुरु करण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त ग्रामस्थांनी अक्षयप्रकाश योजनेचे काम पूर्ण झाल्या खेरीज सबस्टेशन सुरु न करण्याचा पवित्रा घेत अधिकारीवर्गाला लेखी निवेदन दिले. सबस्टेशनला कुलूप ठोकले व सबस्टेशन पहिल्याच दिवशी बंद पाडले.
पाटोदा गटातील विखरणी, कातरणी, विसापूर, आडगाव रेपाळ, कानडी व अन्य गावांना शेतीला
तसेच उद्योग धंद्यांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी सन २०१३ मध्ये विखरणी येथे सबस्टेशन मंजूर केले.
सन २०१३ च्या अखेरीस मंजूर झालेले विखरणी सबस्टेशन २०१६च्या अखेरीसला धीम्या गतीने पूर्ण झाले खरे पण तेही सबस्टेशन त्रुटी ठेऊनच वारंवार ग्रामस्थांनी तक्रारी करूनही विद्युत मंडळाच्या अधिकारी वर्गाने या कामाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले.
अवघ्या ६ महिन्याचे काम तीन वर्ष सुरू राहूनदेखील ते चांगल्या रीतीने पूर्ण झालेच नाही. ग्रामीण भागातल्या प्रत्येकाच्या जिव्हाळ्याची असणारी अक्षय प्रकाश सुरु न करताच कुणालाही खबर न लागू देता वीज मंडळाचे अधिकारी श्री मुनकर, श्री सूर्यवंशी, आॅपरेटर कुऱ्हाडे हे सब स्टेशन सायंकाळी ६ वाजता सबस्टेशन सुरु करण्यासाठी विखरणीत दाखल झाले, मात्र गावात कुजबुज लागताच ग्रामस्थ मोठया संख्येने जमा झाले, ग्रामस्थांचा आवेश पाहून मात्र कर्मचारी वर्गाची तारांबळ उडाली. अक्षय प्रकाश योजने संर्दभत कोणीही अधिकारी वर्गाला समाधानकारक उत्तर देता आले नाही. अखेर ग्रामस्थानी लेखी तक्रार देऊन सबस्टेशन सुरु न करण्याचा निर्णय घेतला.
श्रावण वाघमोडे, श्रीहरी खरे, अशोक कोताडे, राजेंद्र शेलार, सोपान पगार, वाल्मीक शेलार, योगेश उशीर, समाधान वाघमोडे, लक्ष्मण कदम, अरूण ठोंबरे, रवींद्र शेलार, राजेंद्र मढे, जीवन मढे, किसन बीडगर यांनी सबस्टेशनला टाळा ठोकला.(वार्ताहर)

Web Title: Turn off the power sub-station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.